One Liners : 13 September | एका ओळीत सारांश : 13 सप्टेंबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
35

एका ओळीत सारांश, 13 सप्टेंबर 2021

Admin

संरक्षण

  • भारताचा ______ कार्यक्रम, जो 1999 कारगिल युद्धानंतर सुरू करण्यात आला होता आणि ज्याचे अण्वस्त्रांपासून ते सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रांपासून हवाई संरक्षण कवच प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे, असा कार्यक्रम पूर्णत्वास आला आहे – बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (BMD) कार्यक्रम.

राष्ट्रीय

  • _____ संस्थेने “एकलव्य मालिका” नावाचा एक ऑनलाइन परस्परसंवादी शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश वर्गांमध्ये वैचारिक अध्यापन कसे लागू करायचे हे दर्शवण्याच्या उद्देशाने आहे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).
  • ______ या संस्थेला UNESCO इंडिया यांच्यावतीने ‘UNESCO किंग सेजोंग साक्षरता पारितोषिक 2021’ देण्यात आला – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS).

व्यक्ती विशेष

  • भारतीय पर्वतारोही, ज्याने सर्वात कमी कालावधीत रशियातील एल्ब्रस पर्वतशिखर (5,642 मीटर) (युरोपचे सर्वोच्च शिखर) आणि टांझानियामधील किलिमंजारो पर्वतशिखर (5,895 मीटर) (आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर) यशस्वीपणे गाठले – गीता समोटा (CISF हवालदार).
  • भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर’ (IN-SPACe) याचे नवीन अध्यक्ष – डॉ. पवन कुमार गोयंका.

क्रिडा

  • ‘2021 यूएस ओपन (टेनिस)’ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकवल्यानंतर, 53 वर्षात हे जेतेपद पटकावणारी पहिली ब्रिटिश महिला आणि 44 वर्षात ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली ब्रिटिश महिला ठरलेली व्यक्ती – एम्मा रेड्युकानु.

राज्य विशेष

  • विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नंतर, गुजरातचे पुढील मुख्यमंत्री – भूपेंद्र रजनीकांत पटेल.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी _____ परिसरातील ‘आर्थिक विकास संस्था’ येथे ‘डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक’चे उद्घाटन केले – दिल्ली विद्यापीठ.
  • ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) अधिनियम, 1958’च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, ____ सरकारने 28 ऑगस्ट 2021 पासून सहा महिन्यांपर्यंत संपूर्ण राज्य “अशांत क्षेत्र” घोषित केले – आसाम.

ज्ञान-विज्ञान

  • _____ संस्थेने ‘जिओस्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायर्नमेंटल सॅटेलाईट-यू’ (GOES-U) तयार केले आहे, जे पृथ्वीचे हवामान, महासागर आणि पर्यावरणाची प्रगत प्रतिमा आणि वातावरणीय मोजमाप प्रदान करेल – नॅशनल एरोनॉटिक्स आणि स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA), अमेरिका.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्ष चालणाऱ्या _____ नामक प्रायोगिक प्रकल्पाला सुरुवात केली, ज्याचा उद्देश नागपुरातील रस्ता सुरक्षा वाढवणे आणि मृत्यू कमी करणे आहे – iRASTE (इंटेलिजेंट सोल्यूशन्स फॉर रोड सेफ्टी थ्रू टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग).

सामान्य ज्ञान

  • वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) – स्थापना: 29 एप्रिल 1961; मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.
  • भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण (AnSI) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: कोलकाता.
  • भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) – स्थापना: वर्ष 1861; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) – स्थापना: 7 डिसेंबर 1954; ठिकाण: खडकवासला, पुणे, महाराष्ट्र.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम