One Liners : एका ओळीत सारांश, 13 डिसेंबर 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
54

Daily One Liners

एका ओळीत सारांश, 13 डिसेंबर 2021

Admin

संरक्षण

  • ______ आणि भारतीय वायुसेना (IAF) यांनी 11 डिसेंबर 2021 रोजी पोखरण येथे हेलिकॉप्टरद्वारे प्रक्षेपित केले जाणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राची चाचणी घेतली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO).

आंतरराष्ट्रीय

  • जगातील पहिले कागद-विरहित सरकार – दुबई (संयुक्त अरब अमिराती).
  • ______ या संस्थेला सिंपली सुपर्णा मीडिया नेटवर्क (UN Women WEP) याद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘NGO ऑफ द इयर’ यासाठी विशेष पंच श्रेणीतील ‘SABERA (सामाजिक आणि व्यवसाय उद्यम जबाबदार पुरस्कार) पुरस्कार 2021’ मिळाला – एस एम सेहगल फाऊंडेशन.

राष्ट्रीय

  • 12 डिसेंबर 2021 रोजी _____ येथे “डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटिड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अपटू रुपीस 5 लाख” (ठेवीदार प्रथम: पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले – नवी दिल्ली.
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने कार्यरत केलेला नॅशनल हेल्पलाइन अगेन्स्ट अॅट्रॉसिटी (NHAA) – टोल-फ्री क्रमांक 14566.

व्यक्ती विशेष

  • ______ यांना “द पीस बिल्डिंग प्रोजेक्ट” यासाठी प्रतिष्ठित ‘युथ कार्नेजी पीस प्राईज 2021’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्याचे आयोजन हेग (नेदरलँड्स) येथील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (ICJ) या संस्थेद्वारे करण्यात आले होते – रिया महंता (गुवाहाटी).
  • ______ यांना असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट टूर ऑपरेटर्स (ABTO) याद्वारे ‘लॉर्ड बुद्ध इंडिया पीस अँड टुरिझम मित्र पुरस्कार, 2021’ प्रदान करण्यात आला – राजेंद्र पाल गौतम (दिल्ली समाज कल्याण मंत्री).

क्रिडा

  • भारताचा F2 चालक _____ याने ‘2021 अबू धाबी ग्रँड प्रीक्स’ची पहिली स्प्रिंट शर्यत जिंकली – जेहान दारूवाला.

राज्य विशेष

  • आठवी जागतिक तमिळ परिषद 27 ते 29 डिसेंबर 2021 या कालावधीत _____ शहरात आयोजित केली जाईल – चेन्नई.
  • 11 डिसेंबर 2021 रोजी, केंद्रीय बंदरे, जलवाहतुक आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी _____ येथे रिव्हर क्रूझ सेवांचे उद्घाटन केले, जे सागरमाला योजनेच्या अंतर्गत विकसित केले गेले आहे – मरमुगाव बंदर, गोवा.
  • देशातील पहिला “ड्रोन मेळावा” ____ येथे आयोजित करण्यात आला होता – ग्वाल्हेर, मध्य प्रदेश.
  • _____ राज्यात 12 डिसेंबर 2021 रोजी ‘नुपी लाल दिवस’ साजरा करण्यात आला, जो 1939 साली ब्रिटिश वसाहती शासकांच्या मक्तेदारी व्यापार हिताच्या विरोधात लढा देणाऱ्या राज्यातील शूर महिलांच्या स्मरणार्थ पाळला गेला – मणिपूर.
  • वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ____ येथे ‘मेघालयन एज’ दुकानचे उद्घाटन केले – नवी दिल्ली.
  • हस्तकला आणि हातमाग काश्मीर विभागाने आपली पहिली ‘क्राफ्ट सफारी’ _____ येथून सुरू केली, जी खातमबंद हस्तकलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अली मोहम्मद नजर यांच्या कारखान्यापासून सुरू झाली – श्रीनगर.
  • ______ सरकारने पुढील वर्षी दिवाळी ते होळी पर्यंत राज्यातील गरिबांना मोफत अन्न पुरवण्यासाठी ‘निशुल्क खाद्यान्न वितरण’ कार्यक्रमाला सुरुवात केली – उत्तर प्रदेश.

सामान्य ज्ञान

  • पराम्बिकुलम व्याघ्र प्रकल्प – केरळ.
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
  • बिलीगिरी रंगनाथ मंदिर व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.
  • कावल व्याघ्र प्रकल्प – तेलंगणा.
  • सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू.
  • मुकुंदरा व्याघ्र प्रकल्प – राजस्थान.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम