One Liners : 12 September | एका ओळीत सारांश : 12 सप्टेंबर

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
35

एका ओळीत सारांश, 12 सप्टेंबर 2021

Admin

दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय दक्षिण-दक्षिण सहकार्य दिवस – 12 सप्टेंबर.

पर्यावरण

  • “_____” नावाचे चक्रीवादळ 10 सप्टेंबर 2021 रोजी तैवानच्या दक्षिण टोकापासून 580 किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला होते – चंथू.

आंतरराष्ट्रीय

  • 13 मार्च ते 16 मार्च 2022 या कालावधीत होणाऱ्या ‘जागतिक पोलीस शिखर परिषद’चा आयोजक – दुबई पोलीस जनरल कमांड.
  • _____ आणि भारत “क्लायमेट अॅक्शन अँड फायनॅन्स मोबीलाईझेशन डायलॉग (CAFMD)” यांची स्थापना करणार – अमेरिका.
  • 10 सप्टेंबर 2021 रोजी, ____ आणि भारत यांच्यात 20,000 मेगावॅट वीज पुरवण्याच्या क्षमतेसह दुसऱ्या ट्रान्समिशन लाइनच्या विकासासंबंधी सहकार्य करण्यास करार झाला – नेपाळ.

राष्ट्रीय

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळ अभ्यासासाठी बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) येथे _____ यांच्या स्मृतीत एक कक्ष (chair) उभारण्याची घोषणा केली – सुब्रमण्य भारती (तामिळ कवी).
  • भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी 8 सप्टेंबर 2021 रोजी शेतकरी समुदायाला ज्ञान हस्तांतरणासाठी “______” याचे अनावरण केले – ICAR-नेटवर्क प्रोग्राम ऑन प्रेसीजन अॅग्रिकल्चर (ICAR-NePPA).
  • केंद्रीय पर्यटन मंत्रालय 13-14 सप्टेंबर 2021 रोजी ____ येथे ईशान्य भागातील राज्यांच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्र्यांची परिषद आयोजित करत आहे – गुवाहाटी.
  • 27-28 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या “इंडिया फूड अँड न्यूट्रिशन इनोव्हेशन समिट 2021” याचा आयोजक – फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI).

व्यक्ती विशेष

  • भारतीय उपखंडातील पहिले नेत्ररोग तज्ञ, ज्यांना रॉयल कॉलेज ऑफ ऑपथेल्मोलोजीस्ट (लंडन, ब्रिटन) या संस्थेकडून मानद विद्यावृत्ती प्राप्त झाली – डॉ संतोष जी होनवार.

राज्य विशेष

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _____ येथे सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले, जे ग्रामीण भागातील मुलांसाठी वसतिगृहाची सुविधा पुरवते – अहमदाबाद.
  • तामिळनाडू सरकारने जाहीर केले आहे की _____ यांची पुण्यतिथि दरवर्षी 11 सप्टेंबर रोजी महाकवी दिवस म्हणून साजरी केली जाईल – सुब्रमण्य भारती (कवी).
  • 11 सप्टेंबर 2021 रोजी ____ राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पदाचा राजीनामा दिला – गुजरात.
  • ____ राज्यात, ‘नुआखाई’ नावाचा राज्यातील एक महत्त्वाचा कृषी सण 11 सप्टेंबर 2021 रोजी साजरा झाला – ओडिशा.
  • _____ सरकारने 10 सप्टेंबर 2021 रोजी ‘मिलेट मिशन’ याचा प्रारंभ केला – छत्तीसगड.
  • जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले कला आणि संस्कृती केंद्र – श्रीनगर.

सामान्य ज्ञान

  • राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) याची स्थापना – एप्रिल 1984.
  • भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याची स्थापना – 16 जुलै 1929.
  • भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) याची स्थापना – 14 जानेवारी 1965.
  • साहित्य अकादमी – स्थापना: 12 मार्च 1954; ठिकाण: नवी दिल्ली.
  • आयुध निर्मिती मंडळ (OFB) – स्थापना: वर्ष 1712; मुख्यालय: कोलकाता.
  • भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) याची स्थापना – 2 ऑक्टोबर 1958.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम