One Liners : 07 ऑगस्ट | एका ओळीत सारांश : 07 August
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 07 ऑगस्ट 2021
दिनविशेष
- भारतात, राष्ट्रीय हातमाग दिवस – 07 ऑगस्ट.
संरक्षण
- स्वदेशी जहाजबांधणी कार्यक्रमाचा भाग म्हणून, _______ ही कंपनी भारतीय नौदलासाठी अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASWSWC) प्रकाराच्या आठ युद्धनौका आणि सर्व्हे व्हेसेल लार्ज (SVL) प्रकाराच्या चार युद्धनौका तयार करीत आहे – गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लि. (GRSE).
अर्थव्यवस्था
- भारतीय रिझर्व बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यानुसार, रेपो दर – 4 टक्के.
- मार्जिनल स्टँडिग फॅसिलिटी (MSF) दर आणि बँक दर – 4.25 टक्के.
- रिव्हर्स रेपो दर – 3.35 टक्के.
- 2021-22 या आर्थिक वर्षात अपेक्षित ग्राहक दर निर्देशांकावर (CPI) आधारित चलनफुगवट्याचा दर – 5.7 टक्के.
- 2021-22 या आर्थिक वर्षात अपेक्षित GDP (स्थूल देशांतर्गत उत्पादन) वृद्धीदर – 9.5 टक्के.
आंतरराष्ट्रीय
- 6 ऑगस्ट 2021 रोजी, केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री सुभाष सरकार यांनी _____ देशाच्या वतीने आयोजित केलेल्या जी-20 देशांच्या संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला – इटली.
- 5 ऑगस्ट 2021 रोजी ____ येथे आयोजित केलेल्या जी-20 देशांच्या डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीत, जी-20 मंत्र्यांनी “लवचिक, बळकट, शाश्वत आणि समावेशी सुधारणांसाठी डिजीटलीकरणाचा लाभ घेणे” यासाठीच्या जाहीरनाम्याचा स्वीकार केला – ट्रिस्टे, इटली.
राष्ट्रीय
- तीन हातमाग शिल्प गावे, जी वस्त्रोद्योग मंत्रालयाने उभारली आहेत – कोवलम (जि. तिरुअनंतपुरम, केरळ), मोहपाडा (जि. गोलाघाट, आसाम) आणि कनिहामा (जि. बडगाम, जम्मू व काश्मीर).
- भारत सरकारने स्थापन केलेल्या, ‘खेल रत्न पुरस्कार’ याचे नवीन नाव – मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार.
- वर्ष 2015-16 पासून ‘योग आणि ध्यान यांचे विज्ञान व तंत्रज्ञान (सत्यम / SATYAM)’ कार्यक्रम राबवत असलेली संस्था – विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय.
- ____ या संस्थेत देशातील पहिली ‘नॅशनल हार्ट फेल्युअर बायोबँक’ (NHFB) उभारण्यात आली आहे, जी भविष्यातील उपचारांसाठी मार्गदर्शक म्हणून रक्त, बायोसिस आणि वैद्यकीय माहिती गोळा करेल – श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (SCTIMST), तिरुवनंतपुरम, केरळ.
- “उपजीविका वाढीसाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागृती (संकल्प / SANKALP)” योजना हा _______ याचा जागतिक बँकेकडून अर्थ-सहाय्यित कार्यक्रम आहे – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय.
- ‘नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर ऑफ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटारडेशन अँड मल्टिपल डिसेबिलिटीज’ या संस्थेने 7 ऑगस्ट 2021 रोजी ______ येथे ‘डिजिटल सर्वोत्तम प्रथा विषयक राष्ट्रीय परिषद’ आणि बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी उत्तर-पूर्व शिखर परिषद आयोजित केली – दिल्ली.
- ______ योजनेच्या अंतर्गत, NeGD संस्थेच्या सहकार्याने, सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने ‘पीएम-दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष’ मोबाईल अॅप विकसित केले – प्रधान मंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हिताग्रही (पीएम-दक्ष / PM-DAKSH).
ज्ञान-विज्ञान
- _______ या संस्थेने “प्रोजेक्ट रिप्लान” (REducing PLAstic from Nature / REPLAN) अंतर्गत प्लास्टिक-मिश्रित हस्तनिर्मित कागद विकसित केला – खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC).
सामान्य ज्ञान
- कोल इंडिया लिमिटेड (CIL) – स्थापना: वर्ष 1975; मुख्यालय: कोलकाता.
- भारतीय रेल्वे – स्थापना: 08 मे 1845; मुख्यालय: नवी दिल्ली.
- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: नवी दिल्ली.
- विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) – स्थापना: 28 डिसेंबर 1953; संस्थापक: अबुल कलाम आझाद; मुख्यालय: नवी दिल्ली.
- ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाचा आरंभ – वर्ष 2016-17.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents