One Liners : एका ओळीत सारांश,06 ऑक्टोबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 06 ऑक्टोबर 2021
संरक्षण
- 5 ऑक्टोबर 2020 रोजी ओडिशा किनारपट्टीलगत चाचणी घेण्यात आलेले _______, जी सामान्यपणे टॉरपीडोच्या मारा क्षमतेच्या पलीकडचे लक्ष्य भेदण्यासाठी क्षेपणास्त्राद्वारे सोडली जाणारी वजनाने हलकी पाणबुडी-रोधी टॉरपेडो प्रणाली आहे – ‘स्मार्ट / SMART’ (सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडो).
पर्यावरण
- भारत, जर्मनी, ब्रिटन आणि स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी पश्चिम घाटात अस्थिमय मास्याचे नवीन कुटुंब शोधले, ज्याला दिलेले नाव – एनीग्माचन्निडे.
- आघरकर संशोधन संस्था (पुणे) येथील शास्त्रज्ञांना महाराष्ट्र आणि ___ या राज्यांमध्ये पश्चिम घाटात पाईपवॉर्ट म्हणजे पाणगेंद (शास्त्रीय नाव: एरिओकौलोन) या औषधी वनस्पतीच्या दोन नव्या जातींचा शोध लागला – कर्नाटक.
आंतरराष्ट्रीय
- IBM कंपनीच्या मदतीने या देशाच्या मध्यवर्ती बँकेनी सरकारी बचत रोख्यांसाठी जगातले पहिले ब्लॉकचेन तंत्र-आधारित डिजिटल मंच स्थापन केले – थायलँड.
- या संस्थेच्या नेतृत्वात वर्ष 2030 पर्यंत ग्रहावरील जैवविविधतेच्या नुकसानाला आळा घालण्याच्या हेतूने ‘लिडर्स प्लेज फॉर नेचर’ उपक्रम चालविला जात आहे – वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF).
राष्ट्रीय
- शाश्वत पद्धतीने उच्च दर्जाच्या बांबू उत्पादनांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी बांबू उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने तयार केलेले नवे मंच – भारत बांबू मंच.
व्यक्ती विशेष
- ‘हिपेटायटीस सी’ विषाणूच्या शोधासाठी ‘वैद्यकीय किंवा शरीरशास्त्र’ या क्षेत्रासाठी ‘2020 नोबेल’ पुरस्काराचे विजेते – हार्वे जे. अल्टर आणि चार्ल्स एम. राईस (अमेरिका) आणि मायकेल ह्यूटन (ब्रिटिश).
राज्य विशेष
- 1 ऑक्टोबर रोजी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ______ उपक्रमाचा आरंभ करण्यात आला, ज्याचा प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण बनवायचा हेतू आहे – ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्व गोवा‘ उपक्रम.
ज्ञान-विज्ञान
- या संस्थेच्या संशोधकांनी देशी बनावटीचे ‘मौशिक’ मायक्रोप्रोसेसर तयार केले ज्याचा उपयोग इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणांमध्ये केला जाऊ शकतो – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास.
सामान्य ज्ञान
- ऑस्ट्रिया – राजधानी: व्हिएन्ना; राष्ट्रीय चलन: युरो.
- अझरबैजान – राजधानी: बाकू; राष्ट्रीय चलन: मानत.
- बहामास – राजधानी: नसाऊ; राष्ट्रीय चलन: बहामी डॉलर.
- बहरीन – राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरीनी दिनार.
- बांगलादेश – राजधानी: ढाका; राष्ट्रीय चलन: टाका.
- बेलारूस – राजधानी: मिन्स्क; राष्ट्रीय चलन: बेलारूसि रूबल.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents