नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांमधील ५२५६ पदांसाठी लवकरच होणार भरती
Navi Mumbai Police Bharti 2022 Exam Date
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Navi Mumbai Police Bharti 2022 Exam Date
शासनाने राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचाही समावेश आहे. आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे.
ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईसाठी १९९४ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाले. नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल व उरण तालुका असे कार्यक्षेत्र केले. सद्य:स्थितीमध्ये आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ९५३ चौरस किलोमीटर आहे. यामध्ये १४४ किलोमीटर सागरी किनाऱ्याचा समावेश असून, २० पोलिस ठाण्यांत ते विभागले आहे. याशिवाय गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, अमानवी वाहतूक विरोधी कक्षासह इतर शाखाही आहेत.
आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तपशील
आयुक्त – १, सहपोलिस आयुक्त – १, अपर पोलिस आयुक्त – १, पोलिस उपायुक्त – ६, पोलिस अधीक्षक – १, उपअधीक्षक – २, सहायक आयुक्त – ११, निरीक्षक – ८६, राखीव निरीक्षक – १, सहायक पोलिस निरीक्षक – २०२, उपनिरीक्षक – २४१, राखीव उपनिरीक्षक – २, सहायक पोलिस उपनिरीक्षक – २८१, हवालदार – १४८८, शिपाई – २७३७, उपनिरीक्षक चालक – १, हवालदार चालक – ४, शिपाई चालक – ११३, प्रशासकीय अधिकारी – १, स्वीय सहायक – १, उच्चश्रेणी लघुलेखक – २, निम्नश्रेणी लघुलेखक – २, कार्यालय अधीक्षक – १, लेखा अधिकारी १, सहायक लेखा अधिकारी १, स्थापत्य अभियंता १, प्रमुख लिपिक ८, वरिष्ठ श्रेणी लिपिक १५, कनिष्ठ श्रेणी लिपिक ४४
बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा
कार्यालयीन शिपाई – १५, मेस मॅनेजर १, सफाई कामगार १४, शिंपी १, मुख्य आचारी १, सहायक आचारी १, भोजनालय सेवक १, मेस सर्व्हंट १.
शहरातील पोलिस स्टेशन पुढीलप्रमाणे
वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका, उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी.
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents