महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,902

 

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने


महाराष्ट्रात एकूण ०6 राष्ट्रीय उद्याने आहेत .

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

  • चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.
  • याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ.किमी इतके आहे.
  • ताडोबा अभयारण्यात वाघ, बिबळे, नीलगाय, सांबर, चितळ, चिंकारा, इ. वन्यप्राणी आढळतात.
  • सर्व प्राण्यांमध्ये वानरे व माकडांची संख्या जास्त आहे

 नवेगाव राष्ट्रीय उद्यान (गोंदिया)

  • सातपुडा पर्वतरांगेत हे राष्ट्रीय उद्यान आहे.
  • या अभयारण्यात नवेगाव बांध नावाचे एक विशाल सरोवर आहे, याचा सारा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.
  • हिवाळ्यात अनेक पाहुणे पक्षी या सरोवरात उतरतात. नवेगाव सरोवरात अनेक प्रकारचे लहान-मोठे मासे आढळतात.

  पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच (नागपूर)

  • नागपूरपासून काही अंतरावर पवनी हे गाव आहे.
  • त्यापासून २० किमी या अंतरावर पेंच हे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे.
  • पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधले आहे.
  • हिवाळ्यात तोतला डोह येथे अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (मुंबई उपनगर व ठाणे)

  • मुंबईच्या उत्तरेस मुंबई उपनगरात ४० किमी अंतरावर बोरिवली येथे घनदाट राजीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
  • या उद्यानाचा काही भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो.
  • या उद्यानात सदाहरित, निमसदाहरित व खारफुटी अशी तीन प्रकारची वृक्षवने आहेत.
  • वसईच्या खाडीला लागून या उद्यानाचे २५ किमी क्षेत्र हे खारफुटी जंगलाने व्यापलेले आहे.
  • त्यात अनेक प्रकारच्या जलवनस्पती आहेत.
  • यात कोळंबी, बांगडा या माशांचे प्रजोत्पादन होते.

   गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती) 

  • या राष्ट्रीय उद्यानात रानमांजर, रानउंदीर, हरणांची पिल्ले, तसेच सांबर, रानगवे, पक्ष्यांमध्ये बगळे, बुलबुल, निळकंठ, इ. दिसतात
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी) – वारणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला चांदोली धरण असे म्हणतात.
  • सांगली जिल्ह्य़ातील बत्तीस शिराळा या ठिकाणी हे धरण आहे.
  • या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नसíगक जंगले आहेत.
  • या ठिकाणी अनेक वन्यप्राणी आढळतात. नुकताच याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

   मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान 

  • सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राचे पहिले सागरी उद्यान आहे.
  • तर देशातील हे तिसरे सागरी राष्ट्रीय उदयान आहे, यात सर्जेकोट खाडीपासून मालवण बंदर, सिंधुदुर्ग किल्ला ते देवबागेपर्यंतच्या जल क्षेत्राचा समावेश होतो.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम