तीन हजार कंत्राटी पोलिसांच्या भरतीला मंजुरी; राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रक्रिया राबवण्यात येणार!

Mumbai Police Bharti 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,658

Mumbai Police Bharti 2023

 

मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर तीन हजार मनुष्यबळ भरण्याच्या निर्णयाला गुरुवारी (ता. १२) मान्यता देण्यात आली. मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती असलेला GR आम्ही खालील लिंक वर देत आहोत. 

राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. पोलिस दलाचे खासगीकरण करण्याचे हे पाऊल असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुंबई पोलिसांमध्ये ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय अमलात येणार आहे. मुंबई पोलिस दलात १० हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.

आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी, अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्या पार्श्वभूमीवर ही पोलिस भरती राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून करण्यात येणार आहे. ११ महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. त्यानंतर पुन्हा हे जवान सुरक्षा महामंडळाच्या सेवेत रुजू होणार आहेत. यासाठी १०० कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तीन महिन्यांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये दिले जाणार आहेत. माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले की, पोलिस दलातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला. येत्या काळात सणांचे दिवस पाहता सुरक्षेसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपयोग होणार आहे. महामंडळाचा भाग असल्यामुळे इतर शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांसारख्या समस्यांना या कंत्राटी कामगारांना सामोरे जावे लागणार नाही.

 

कंत्राटी पोलिस भरतीमुळे राज्यातील सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर येईल, अशी टीका करीत पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरले होते. यावर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते.

कंत्राटी पोलिस भरतीवरून पावसाळी अधिवेशनात वाद 

– पोलिस दलात कंत्राटीतत्त्वावर कोणतीही भरती केली जाणार नाही. सध्या केवळ पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान वापरले जाणार आहेत.
– ही पोलिस दलातील कंत्राटी भरती नाही. आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळातर्फे जवान देतो, तसेच याठिकाणी देत आहोत.
– राज्य सरकार पोलिस भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीचा वापर करण्याचा कुठलाही विचार करत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

 

नवीन प्रकाशित GR बघा

 

 

 


मुंबई पोलीस दलात ८१९ पदांची कंत्राटी पदभरती सुरु!

Mumbai Police Bharti 2023

 

राज्य सुरक्षा महामंडळामार्फत मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला होता. त्याची प्रक्रिया सुरू करताना राज्य सुरक्षा महामंडळाने तीन हजार सुरक्षा रक्षक २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून पुरविणार असल्याचे जाहीर करताना सुरक्षा रक्षकांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.

 

राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद चालू असतानाच आता पोलिस दलातही कंत्राटी भरतीची प्रक्रिया चालू केल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलिस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. पोलिस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर केली आहेत. त्यापैकी दहा हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. सणासुदीत बंदोबस्तासाठी अतिरिक्त गरज भासते, असे गृह विभागाने स्पष्ट केले होते.

 

मोहोळ तालुक्यात ७५ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध,पिण्याचे पाणी,चाऱ्याचे नियोजन करा- यशवंत माने राज्य सरकारने पोलिस भरतीही कंत्राटी करण्याचा निर्णय घेतला आहे, कंत्राटी शिपाई कर्तव्यात किती दक्ष असतील हा सवाल आहेच; पण बेरोजगारांना काही महिने राबवून पुन्हा बेरोजगारीत ढकलून दिले जाईल. कंत्राटी भरती करण्याचा चंग बांधलेले शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार विरोधी पक्षांना आणि त्यांच्या विरोधाला तसूभरही जुमानत नसल्याचे चित्र आहे.

 

 


Mumbai Police Bharti 2023 | मुंबई पोलीस दलात “शिपाई” संवर्गाची तब्बल दहा हजार पदे रिक्त!

Mumbai Police Bharti 2023

Mumbai Police Bharti 2023 : मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित पोलीस शिपाई संवर्गाची तब्बल दहा हजार पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दुसरीकडे रिक्त पदे यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे.

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित पोलीस शिपाई संवर्गाची तब्बल दहा हजार पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि दुसरीकडे रिक्त पदे यामुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे.

गृह खात्याकडील एका आकडेवारीनुसार बृहन्मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची सुमारे 40 हजार 623 पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ हे सर्व प्रकारच्या दैनंदिन कामासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस शिपायांची सुमारे 7 हजार 76 पदे आणि पोलीस चालकांची 994 पदे भरण्यात येणार आहेत. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे गृह विभागाच्या एका प्रस्तावात नमूद केले आहे.

मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अपुऱया मनुष्यबळामुळे सध्या पोलिसांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या बंदोबस्ताच्या कामासाठी सध्या पोलिसांना जुंपले आहे. पुढील काही दिवसांतच सणांचा मोसम सुरू होईल. त्या काळात बंदोबस्तात वाढ होईल. त्यापाठोपाठ पोलिसांवरील कामाचा ताणही वाढत जाणार आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.


मुंबई पोलीस दलात बाययंत्रणेमार्फत तीन हजार मनुष्यबळ पदे भरणार

Mumbai Police Bharti2023 | Free Job Alert

Mumbai Police Recruitment 2023 : मुंबई पोलीस दलात सुमारे दहा हजार पोलीस शिपायांची पदे रिक्त असल्याने बाह्य यंत्रणेमार्फत तात्पुरत्या स्वरुपात तीन हजार मनुष्यबळ ( कर्मचारी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळाकडून हे मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार असून, त्यांना सुरक्षाविषयक आणि बंदोबस्ताचे ( गार्ड व स्टॅटिक ड्यूटी) काम देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार नसल्याची ग्वाही बुधवारी विधिमंडळात दिली.

  1. मुंबई पोलीस दलात बाह्ययंत्रणेमार्फत तीन हजार मनुष्यबळ सेवा राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यास गृहविभागाने २४ जुलै २०२३ रोजी शासननिर्णय जारी करून परवानगी दिली होती. त्यामुळे पोलीस दलात कंत्राटी भरती सुरू झाली, असा आक्षेप विरोधकांकडून विधानपरिषदेत मंगळवारी घेण्यात आला होता. यासंदर्भात फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात सविस्तर निवेदन केले. “मुंबई पोलीस दलात शिपाई संवर्गातील सुमारे १० हजार पदे रिक्त आहेत. दरवर्षी सुमारे दीड हजार पोलीस सेवानिवृत्त होतात आणि त्यांच्या आंतरजिल्हा बदल्याही होतात. (Free Job Alert)२०१९, २०२० आणि २०२१ मध्ये पोलीस भरती झालेली नाही.
  2. आजार, अपघात आणि करोनामुळे ५०० पोलीस मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील रिक्त पदांचा विचार करून १४ हजार ९५६ पोलीस शिपाई आणि २१७४ चालक संवर्गातील आणि राज्य राखीव पोलीस दलातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या १८ हजार ३३१ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ७०७६ शिपाई आणि ९९४ चालक संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. तरीही काही पदे रिक्त राहणार आहेत. भरतीप्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण होऊन पोलीस शिपाई उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागणार असल्याने पोलीस आयुक्तांनी १७ एप्रिल २०२३ रोजी राज्य सुरक्षा महामंडळाकडून तीन हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
  3. “प्रत्यक्ष पदभरतीचा कालावधी किंवा जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी या मनुष्यबळाच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नियमित पोलीस शिपाई उपलब्ध झाल्यानंतर बाह्ययंत्रणेमार्फत नेमल्या गेलेल्या मनुष्यबळाच्या सेवा संपुष्टात येतील’, असे फडणवीस यांनी सांगितले.
    राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जवानांमार्फत विविध केंद्र आणि राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणे आदींसाठी नियमितपणे सुरक्षा वापरली जात आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
  4. ‘सेवानिवृत्तांच्या नियुक्त्यांबाबतही विचार’ – बाह्यस्त्रोतांद्वारे कर्मचारी नियुक्त करण्याऐवजी ६२-६३ वयापर्यंतच्या इच्छुक आणि तंदुरुस्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी केली. त्यांचे प्रशिक्षण झालेलेच असते आणि दलात काम केले (Free Job Alert) असल्याने सर्व बाबींची माहिती असते, असे परब यांनी नमूद केले. त्यावर त्यातून कोणते कायदेशीर मुद्दे उपस्थित होतील, हे तपासून या पर्यायाचाही विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
  5. ‘कायदा अंमलबजावणी, तपासाचे काम नाही’ – या कर्मचाऱ्यांना कायदेविषयक अंमलबजावणी आणि तपासाचे कुठलेही काम दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नियमित पोलीस शिपाई उपलब्ध होतील आणि या बाह्ययंत्रणेकडून उपलब्ध झालेल्या मनुष्यबळाची सेवा संपुष्टात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

——————————————————————————

मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती? गृह विभागाने वृत्त फेटाळले

 

Mumbai Police Bharti2023 : मुंबई पोलीस दलात कंत्राटी तत्वावर भरती होणार असल्याचे वृत्त गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कंत्राटी स्वरुपाची भरती होणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले होते. हे वृत्त धादांत खोटे असल्याचे गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.

पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होणारही नाही, असे या सूत्रांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनातही विरोधकांनी सरकारवर या मुद्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.

राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. (Free Job Alert) त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत 289 अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात प्रखर विरोध दर्शविला होता.

विधिमंडळात आणि सर्वसामान्यांमध्येही पोलीस दलातील कंत्राटी भरतीच्या मुद्यावर नाराजी दिसून आली होती. याबाबत गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पोलीस दलातील कंत्राटी भरतीबाबतचे वृत्त धादांत खोटे आहे. पोलीस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, असेही उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

गेल्या काळात पोलीस भरती न झाल्याने आणि मागील पोलीस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलीस जिल्हा बदल्यांसाठी सोडल्याने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. पोलीस शिपायांची सुमारे 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते मिळण्यास विलंब लागतो, असंही गृह खात्यातील सूत्रांनी सांगितले.

काय होते वृत्त?

मुंबई पोलीस दलात नेहमी मनुष्यबळाची टंचाई असते. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पोलिसांची वेगवेगळ्या कारणासाठी गरज भासत असते. त्यामुळे मुंबई पोलीस दलात नव्याने भरती करण्याची विनंती पोलीस आयुक्तांनी गृहविभागाकडे केली होती.

दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांची कंत्राटी पदभरतीसाठी गृहखात्याने निर्णय घेतला आहे. ज्यात मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई ते पोलीस सहाय्यक निरीक्षकांची 40 हजार 623 पदे मंजूर केली आहेत. तर मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागात दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या महत्वाच्या सणांच्या काळात बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे अशावेळी या कंत्राटी पोलिसांची मदत होणार आहे.


तीन हजार कंत्राटी पोलिसांच्या भरतीला मंजुरी; राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रक्रिया राबवण्यात येणार!तीन हजार कंत्राटी पोलिसांच्या भरतीला मंजुरी; राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रक्रिया राबवण्यात येणार!

 

Talathi bharti 2023
Talathi bharti 2023

App Download Link : Download App

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Mumbai Police,Mumbai Police News,Mumbai Police Recruitment 2023,Mumbai Police Recruitment,मुंबई पोलीसमुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती?,Mumbai police bharti latest news,Mumbai Police Bharti2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम