लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा
Myukhyamantri Ladki Bahin Yojana Installment Update
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा
या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा केले जाणार आहेत? एकदा चेक करा..
Myukhyamantri Ladki Bahin Yojna : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले असताना लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नं टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे.
शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहेत. या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणाच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना ही रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संभ्रम आहे. तुमच्याकडे बँकखाते क्रमांक नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही ही रक्कम तपासता येणार आहे.
तुमचे पैसे आधारकार्डवरून येणार आहेत!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.
कोणत्या बँकेला आधारकार्ड जोडलंय तपासा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकाहून अनेक अकाऊंट असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक अकाऊंटला आधारकार्ड लिंक करता येते.
- सर्वप्रथम येथे या संकेतस्थळावर जा.
https://myaadhaar.uidai.gov.in/ - यात तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉगइन करा.
आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा - यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
- आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents