Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,341

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर 20 आणि 21 फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी या विषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

मृद व जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया परीक्षा रद्द
अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर मृद आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी परीक्षा केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियंता पदाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यात 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते. तर सदर भरती प्रक्रिया ही टीसीएस मार्फत घेण्यात आली होती.

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

मात्र या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या करिता गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेत आपली मागणी लावून धरली होती, सोबतच संबंधित विभागाला अनेक तक्रारी देखील दिल्या होत्या. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

परीक्षा नवी, पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच- विजय वडेट्टीवार

पेपर फुटीच्या या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले, WCD चा अमरावती येथील ड्रीमलँड सेंटरवर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला होता.

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. तसेच अर्जाचा कालावधी १ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान राहू शकतो. या संदर्भातील एक परिपत्रक विभाग याद्वारे जाहीर केले आहे. तसेच हि भरती प्रक्रिया TCS/ IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. या संदर्भातील पूर्ण जाहिरात आणि पुढील अपडेट्स लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल.

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

GR पहा   

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

App Download Link : Download App

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रियेला मंजुरी!

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2023

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत  असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री यांनी दिली. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे लवकरच राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील एक नवीन परिपत्रक आम्ही खाली देत आहो. 

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

PDF परिपत्रक डाउनलोड करा

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना दि.21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरीता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे.

या परीक्षेसाठी अभ्यासक्रमास तत्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करुन पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2023

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना दि.21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरीता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे.

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment | मोठी बातमी! मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द!!

या परीक्षेसाठी अभ्यासक्रमास तत्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करुन पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम