MPSC Exam – मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय; TCS मार्फत घेणार रिक्त पदांच्या परीक्षा!!

MPSC Recruitment 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,809

MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठीची परीक्षा टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शासकीय सेबेतील ७५ हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीत तक्रारी आल्यानंतर या विभागाच्या परीक्षा अनेकदा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या प्रतिष्ठित आणि अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षीच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे, असे ठरले होते. त्याप्रमाणे आधीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती आणि इतर अटी-शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MPSC Exam

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम