MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपलब्ध, डाउनलोड करा!

MPSC Rajyaseva Answer Key 2024

28

MPSC Rajyaseva Answer Key 2024

MPSC Rajyaseva Answer Key 2024 :  जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आयोगाकडुन दिनांक १४ व १८ एप्रिल, २०२४ रोजी खालील संवर्गाची संगणक प्रणालीवर आधारित लघुलेखन- टंकलेखन चाचणी आयोजित करण्यात आली होती. उपरोक्त नमुद संवर्गाच्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीस उपस्थित उमेदवारांच्या Response Sheet त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ३. उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये Response Sheet उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवारांनी ती त्या दिनांकापासून तीस दिवसांत download करून ठेवणे आवश्यक आहे. तद्नंतर सदर Response Sheet उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये दिसणार नाहीत. तदनंतर Response Sheet बाबतच्या मागणीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MPSC लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपलब्ध, डाउनलोड करा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) समाज कल्याण अधिकारी गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब या पदांची परीक्षा १८ ऑगस्टला घेण्यात आली. या संयुक्त चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून यावर ३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. MPSC ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती.

आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर आयोगाने १८ ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले. यानुसार समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांसाठी संयुक्त चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्याची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकती ३ सप्टेंबरपर्यंतच पाठवाव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२३” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची अंतिम उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत “राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३” या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यापुढे यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

MPSC SSE Mains Final Answer key PDF 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम