MPSC PSI Result 2023 | MPSC PSI परीक्षा निकाल जाहीर

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी व निवड यादी डाउनलोड करा

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,025

MPSC PSI Result 2023

MPSC PSI Result 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज  जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
 
या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील श्री. खचकड सुनिल भगवान,  हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश,  ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.
 
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
 

MPSC PSI Final Result PDF

 

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ ( पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट- ब मुख्य परीक्षा – २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल दिनांक १९ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

२. प्रस्तुत परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्हयातील श्री. खचकड सुनिल भगवान, बैठक क्रमांक A001116 हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश, बैठक क्रमांक Ns002006 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.

३. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ४. प्रस्तुत ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल. ५. प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

___________________________________________

MPSC PSI मुख्य परीक्षा 2020 – MPSC PSI निकाल जाहीर निवड यादी आणि गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करा

MPSC PSI Result 2023‍

MPSC PSI Result 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेसाठी महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2020 साठी तात्पुरती निवड यादी आणि सामायिक गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा MPSC PSI मुख्य निकाल 2023 आणि मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करू शकतात.

MPSC PSI Result 2023 | MPSC PSI परीक्षा निकाल जाहीरMPSC PSI Result 2023 | MPSC PSI परीक्षा निकाल जाहीर

MPSC PSI Result 2023
                                               MPSC PSI Result 2023

MPSC PSI Mains 2020 मेरिट लिस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC पोलीस उपनिरीक्षक निकाल 2023 जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची MPSC STI Mains अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपासू शकतात तसेच आयोगाने MPSC कट ऑफ मार्क्स 2023 आणि MPSC मेरिट लिस्ट 2023 देखील जारी केली आहेत. याशिवाय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून निकाल PDF डाउनलोड करू शकता.

१. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा – २०२० पोलीस उप निरीक्षक या परीक्षेची तात्पुरती गुणवत्तायादी व ई.डब्ल्यु.एस. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ६५ पदांचा निकाल राखीव ठेऊन तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
२. प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.
३. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील %

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम