पोलिस उपनिरीक्षक भरती रखडलेल्या निकालाचा नऊ हजार उमेदवारांना फटका!

MPSC PSI Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
168

MPSC PSI Recruitment 2024

 

मित्रांनो,आपल्याला माहीतच आहे, कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे स्पर्धा परीक्षेच्या लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशाच बदलली. त्यातून सावरत लाखो विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ ची ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा’ दिली. मात्र, त्यांच्या मागची ही साडेसाती काही थांबली नाही. प्रशासकीय अडचणींमुळे मुख्य परीक्षा तब्बल नऊ महिने रखडली. कशीबशी मुख्य परीक्षा झाली, काही पदांचे निकालही लागले. मात्र, अजूनही पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचा निकाल रखडला असून, जवळपास नऊ हजार उमेदवारांचे भविष्य अंधारात आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ पोलिस उपनिरीक्षक पदाची तयारी करणारे हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेनंतर ४५ दिवसांच्या आत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही त्याबद्दल कोणतेच ‘अपडेट’ नाही. जर हा निकाल लांबला तर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अजून वर्षभर वाट पाहण्याची वेळ उमेदवारांवर येईल.

मुख्य परीक्षा देणारा प्रशांत सांगतो, ‘‘कोरोना काळात अत्यंत संयमाने आणि कष्टाने आम्ही परीक्षेची तयारी केली. आधी मुख्य परीक्षा रखडली आता सर्वांचे निकाल घोषित झाले. पोलिस उपनिरीक्षकांचा मात्र बाकी आहे. त्यामुळे उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही. त्यात जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल.’’ तातडीने निकाल घोषित करून शारीरिक चाचणी घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत.

 

 

पोलिस उपनिरीक्षक भरती रखडलेल्या निकालाचा नऊ हजार उमेदवारांना फटका!

App Download Link : Download App

या पदांचा निकाल घोषित
महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ संयुक्त परीक्षेत दुय्यम निबंध (एसआर), सहायक कक्ष अधिकारी (एएसओ), राज्य कर निरीक्षक (एसआयटी) या पदांचे निकाल घोषित.

उमेदवार म्हणतात…
– पीएसआय पदाचा निकाल रखडल्याचे कुठलेही कारण किंवा स्पष्टीकरण आयोगाकडून मिळालेले नाही
– परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही
– लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे
– त्यामुळे हा निकाल रखडून शारीरिक चाचणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडण्याचीही शक्यता
– येत्या आठवडाभरात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करावा

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम