राज्यसेवा परीक्षा २०१९ पदसंख्येतील बदलाबाबत घोषणा.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019
● पदसंख्या व आरक्षणातील बदलाबाबत घोषणा
● आता 431 ऐवजी 420 पदांसाठीचा निकाल लागेल.
राज्यसेवा परीक्षा २०१९ पदसंख्येतील बदलाबाबत घोषणा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ फेब्रुवारी, २०१९ रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१९ करिता
दिनांक १० डिसेंबर, २०१८ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद संवर्ग/पदसंख्येच्या अनुषंगाने झालेले बदल
दिनांक १३ व २९ डिसेंबर, २०१८, दिनांक ४ मे, २०१९ तसेच दिनांक १७ मे, २०१९ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात आले आहेत. त्यानुसार दिनांक २४ मे,२०१९ रोजी राज्य सेवा मुख्य परीक्षा- २०१९ करीता जारी करण्यात आलेल्या
अधिसूचनेमध्ये सदर परीक्षेमधून भरावयाच्या विविध १७ संवर्गातील एकूण ४३१ पदांचा समावेश करण्यात आला होता.
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बोसीसी-२०१८/प्र.क्र.५८१ए/१६-ब, दिनांक ४ जुले, २०१९ अन्वये राज्य
शासनाच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात आली असल्याने तसेच, जनहित
याचिका क्रमांक १७५/२०१८ ब इतर प्रकरणातील मा.उच्च न्यायालयाचे दिनांक २७ जून, २०१९ रोजीचे आदेश विचारात घेवून
सरळसेवा भरतीमध्ये सामाजिक व शेक्षणिक मागास प्रवर्गाकरोता १३% आरक्षणानुसार पद भरतोची कार्यवाही करण्यात यावी, असे
शासनाकडून शासन पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०१८/प्र.क्र.६३१ए/१६-ब, दिनांक ४ जुले, २०१९ अन्वये
आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त उद्योग अधिकारी तांत्रिक, गट-ब संवर्गाच्या सुधारित आकृतीबंधामुळे सदर संवर्गाची
मंजूर पदसंख्या कमी झालो आहे. परिणामी मागणीपत्रामधोल पदे कमो झाली असून आढाव्याअंती दिव्यांग व्यक्ती करोता ०१ पद
उपलब्ध होत असल्याचे शासनाच्या संबंधित विभागाकडून आयोगास कळविण्यात आले आहे. सदर सर्व बाबींच्या अनुषंगाने
विषयांकित परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गाकरीता शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे
एकूण १७ संवर्गातील ४२० पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल
राज्यसेवा परीक्षा २०१९ पदसंख्येतील बदलाबाबत घोषणा वाचा