टंकलेखन कौशल्य चाचणी प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध; ०७ एप्रिल २०२३ रोजी परीक्षा !! | MPSC Group C Admit Card Download 2023
MPSC Group C Admit Card Download 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Group C Admit Card Download 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदासाठी टायपिंग कौशल्य चाचणीसाठी हॉल तिकीट जारी केले आहे. प्रवेश प्रमाणपत्राबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी बसणार आहेत ते त्यांचे प्रवेशपत्र खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र असलेल्या व प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत:-
२. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय चाचणीस प्रवेश दिला जाणार नाही.
३. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित चाचणी उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर चाचणी कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
४. टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना चाचणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
५. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
६. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in किंवा support online@mpsc.gov.in या ईमेल आणि/अथवा १८०० – १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
७. टंकलेखन कौशल्य चाचणीची कार्यपध्दती व स्वरुप उमेदवारांना अवगत व्हावे याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Typing Skill Test > Mock Test’ येथे वेबलिंक स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Download MPSC Clerk Typist and Tax Assistant Typing Skill test Hall Ticket
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
MPSC Group C Admit Card Download 2023
Table of Contents