MPSC दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 – राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Duyyam Seva Result 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ व २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण ६०९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक ०८ डिसेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
- सदर परीक्षेमध्ये औरंगाबाद जिल्हयातील श्री. पडुळ अक्षय दिवाण, बैठक क्रमांक AU004129 हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून सांगली जिल्हयातील श्रीमती म्हस्के नम्रता ज्ञानदेव, बैठक क्रमांक PN004428 ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. मागासवर्गवारीतून जळगांव जिल्हयातील श्री. अक्षय अनिल परदेशी, बैठक क्रमांक A001054 हे राज्यात प्रथम आले आहेत.
- उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
- प्रस्तुत निकालात नमुद केलेल्या सर्व शिफारसपात्र उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाचे दावे/प्रमाणपत्रे विहित प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास, शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
प्रस्तुत अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. (कृपया आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना क्रमांक ६.४.४ पहावे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
निकाल डाउनलोड करा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC Duyyam Seva Result 2022,
MPSC Result 2022,
MPSC दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 निकाल,
राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल,
Table of Contents