MPSC राज्यसेवा 2020 परीक्षेची तयारी कशी करावी – मास्टर प्लॅन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
238

5 एप्रिल 2020 रोजी होणार्‍या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी  सर्व यूर्जसला प्रत्येक टप्प्यावर येणार्‍या अडचणीत मदत मिळावी या उद्देशातून ही लेख मालिका सुरु करत आहोत. अगदी परिक्षेच्या दिवसापर्यंत या माध्यमातून तुमच्या सोबत राहू व मार्गदर्शन करु.

 Syllabus चे महत्व काय व त्याचा उपयोग कसा करता येईल

कोणत्याही परीक्षांचा अभ्यास काय हे Syllabus वरुनच आपल्याला कळते. आयोगाने आपल्याला पूर्व परीक्षेचा Syllabus काही वाक्यांत दिला आहे. पण आपण एक अधिकारी होणार असल्याने, जरी आयोगाने अगदी संक्षिप्त Syllabus दिलेला असला तरी आपण आपला स्वत :चा एक Box (Syllabus) तयार करु शकतो. बॉक्सचा फायदा असा की – प्रत्येक विषयाचा एक बॉक्स असल्यास त्यात त्या विषयासंबंधीचे सर्व टॉपीक असतील, तर ते आपल्याला Study करणे खूप सोपे होईल.

एकप्रकारे, हा बॉक्स म्हणजे आपण आयोगाच्या Footprint  चा उपयोग करुन आपला स्वत: चा एक  Box (Syllabus) तयार करावा. पुढील पॉईंटमध्ये या बॉक्स बद्दल चर्चा केल्यावर तुमचा विश्‍वास बसेल की तो पुर्णपणे Authentic असेल आणि तो तुम्ही स्वत : तयार कराल. हो हे इतके सोपे आहे.

 Previous Year Question Paper Analysis या घटकाचा उपयोग पूर्व परीक्षेच्या अभ्यासात कसा करावा?

MPSC – UPSC करणारा प्रत्येक विद्यार्थी या प्रक्रियेतून कधीतरी जातोच त्याला QPA करावेच लागते. त्याला काही वेगळा पर्याय नाही. हे प्रत्येकालाच करणे आहे पण आज विचार केला तर परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे आपण या पूर्व परीक्षेसाठी दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे बाजारातील एक उत्तम पूर्व परीक्षा Syllabus पुस्तक निवडणे.

  •  वरील पुस्तकात विषयानुसार आधीच वर्गीकरण असेल आपल्याला फक्त याचे Topics नुसार वर्गीकरण करायचे आहे.
  • या केलेल्या वर्गीकरणाच्या Topics मध्ये ज्या वर्षात जास्त प्रश्न असतील त्यानुसार बघीतल्यास आपण एक बॉक्स तयार करु शकतो.

याप्रकारे प्रत्येक विषयाबद्दल जर आपण असच केल तर आपण प्रत्येक विषयाला एक बॉक्स करु शकतो. आपल्याला पुढील Journey मध्ये या बॉक्स चा खूप जास्त फायदा होईल.

या analysis वरून आपण जर मागील ५ वर्षांचे विश्लेषण केले तर आपल्याला syllabus box (स्वत: चा Syllabus)साठी Topics मिळतील. या मुळे कमी वेळेत तुम्ही सर्व महत्व पूर्ण topics कव्हर करू शकणार आहात.

 Notes काढणे

हो या परीक्षेत Notes स्वत जवळ असणे खूप गरजेचे आहे. या नोट्स आपल्याला परीक्षा जशी जवळ येत जाते – शेवटचे 30 दिवस उरतात. तेव्हा तसेच अगदी कमी वेळेत Short Revision साठी या नोट्स फायद्याच्या असतात. पण आपण काही सर्व विषयाच्या सर्व टॉपीक्स च्या नोट्स काढू शकत नाही. आणि ते गरजेचे सुद्धा नाही. कोणत्या टॉपीक्स च्या नोट्स काढायाचा व त्या कशा काढाव्यात हे आपण विषयानुसार पुढील लेखांमध्ये बघू.

यात अजून एक पॉईंट म्हणजे आपण येथे थोड Smart Work पण करु शकतो. जसे की, नोट्स स्वतच्या असणे एक फायदेशीर व चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला अशा नोट्स भेटल्या असतील ज्या अगदी प्रॉपर आहे व त्यातून तुम्हाला हवे असलेले टॉपीक्स कॅव्हर होत आहे. तर तिचा वापर करु शकतो. या प्रकारे आपण अभ्यास करतोच पण त्या सोबतच आपण आपला महत्वाचा वेळ वाचवून तो इतर अभ्यासाला देऊ शकतो.

 पुस्तकांची निवड व Book List

हा पॉईंट आपण वेगळ्या पद्धतीन बघू. यामध्ये आपण Booklist चे महत्व न बघता विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात व ते कोठे चूक करतात किंवा करु शकतात याचा विचार करु.

तर आपल्याला माहित आहे. MPSC चा Final निकाल लागल्यावर नविन अधिकार्‍यांच्या बुक लिस्ट येतात व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिस्ट चेंज होत जातात व एक महिन्यात त्यात अनेक Books ची भर पडते. पण पूर्व परीक्षासाठी आपल्याला अशा एका विषयाला 3-4 Books असून चालत नाही. त्यामुळे बुक लिस्टची निवड एक सोप्या पद्धतीने होऊ शकते.

  • मागील परीक्षांत आलेला प्रत्येक टॉपीक्स या पुस्तकातून Cover होतोय का?
  •  हे पुस्तक वाचून प्रश्‍न सोडवले तर मला त्या प्रश्‍ना विषयीची माहिती या पुस्तकात भेटते का ?

वरील गोष्ट लक्षात घेतल्या, बस झाल तुम्हाला त्या विषयासाठी पुस्तक मिळालं. फक्त एका विषयासाठी 1-2 पुस्तक असाव म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा Revision साठी अडचण होणार नाही. आपण विषयानुसारच्या पुढील लेखांमध्ये प्रत्येक विषयासाठी काही पर्याय सुचवू.

MCQ प्रश्‍नसंच व सराव

हे Explain करण्याआधी तुमच्यासाठी हे समजणे महत्वाचे आहे कि – “ही परीक्षा जास्तीत जास्त पुस्तक Read करण्यासाठी आहे की MCQ Solve  करण्यासाठी” !

तर ही परीक्षा MCQ ची आहे. थोड व्यव्हारीक विचार करा. अभ्यास करायचाच आहे आणि तो महत्वाचा आहे. पण त्यासोबतच MCQ चा सराव होणे पण तितकाच आवश्यक आहे.  MCQsच अजून एक महत्व, ते म्हणजे आपण केलेला अभ्यास किती समजला, खरं ते लक्षात येईल.

त्यामुळेच 2020 च्या पूर्व परीक्षेसाठी आतापासून रोज 100 MCQ Solve करणे गरजेचे आहे. आपल्या दिवसातील एकूण अभ्यासाच्या टाईम पैकी 20 टक्के टाईम वरील   सरावासाठी ठेवणे ही आता या परीक्षेची गरज आहे, असे समजावे.

 Revision आवश्यक

तुम्ही बऱ्याच वेळा असे विद्यार्थी तुमच्या आजुबाजूला बघीतले असतील ज्यांना प्रश्‍न विचारल्यास ते Options ची वाट न बघता Direct उत्तर देतात. म्हणजे त्यांना त्या गोष्टी पाठ असतात. आपण याचा सोईस्कर अर्थ घेतो त्याने रट्टा मारला आहे. पण असे खूप कमी वेळा असते. हे विद्यार्थी रट्टा न मारता तो विषय / टॉपीक पुन्हा पुन्हा वाचत राहतात. म्हणजेच त्या गोष्टीची Revision करतात.

स्पर्धा परीक्षेत Revision करणे खूप महत्वाचे ठरते. कारण या परीक्षेचा अभ्यास न संपणारा आहे. म्हणून प्रत्येक विषयाची एका गॅपनंतर Revision गरजेची होते. यासाठी एक Strategy आहे.

0-7-30

या Strategy मध्ये ‘0’ म्हणजे आपण त्या दिवशी वाचलेला टॉपीकची रात्री किंवा पुढील एक दिवसात अगदी Quick Revision. त्यानंतर ‘7’ म्हणजे तोच टॉपीक सात दिवसानंतर पुन्हा एकदा Revise करणे व पुढे ‘30’ म्हणजे पुन्हा तो टॉपीक 30 दिवसानंतर त्याच पद्धतीने पुन्हा Read करुन संपवणे. यामुळे तो Topic तुमचा अगदी पक्का होईल. याप्रमाणे सर्व Topic चे तुम्ही तुमच्या Convenience नुसार Plan करु शकतात व तुमच्या Schedule मध्ये Revision हा Point Add कल्यास तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम