व्यक्ती विशेष : मोरारजी देसाई
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
आज (29 फेब्रुवारी) मोरारजी देसाई यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 ला गुजरातमधील बुलसर जिल्ह्यात भादेली गावात झाला. छोट्या मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही परिस्थितीत कठोर मेहनत ही मूल्ये आत्मसात केली.
सेंट बुसर हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन मुंबई प्रांतातील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवी घेतली, आणि उपजिल्हाधिकारी म्हणून 12 वर्षे काम केले.
1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान देसाई यांचा ब्रिटीश न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.
1931 मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले. 1937 मध्ये पहिल्या काँग्रेस सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर देसाई हे तत्त्कालीन मुंबई प्रांतात बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकारी मंत्री होते.
1946 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकानंरत, ते मुंबईत गृह आणि महसूल मंत्री झाले. या काळात त्यांनी जमीन महसुलात अनेक सुधारणा केल्या. पोलिस प्रशासनात त्यांनी जनता आणि पोलिस यांच्यातील दरी दूर केली. 1952 मध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री बनले.
राज्यांची पुनर्स्थापना केल्यांनतर, 14 नोव्हेंबर 1956 रोजी देसाई वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. नंतर 22 मार्च 1958 रोजी त्यांनी अर्थ खात्याचा कार्यभार स्वीकारला.
1967 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात देसाई यांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जुलै 1969 मध्ये, गांधी यांनी त्यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले. 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले, मात्र देसाई काँग्रेस संघटनेसोबत राहिले.
आणीबाणी घोषित झाल्यानंतर, 26 जून 1975 रोजी देसाई यांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांना एकांत कारावासात ठेवण्यता आले आणि लोकसभा निवडणुका घेण्याच्या निर्णयापूर्वी 18 जानेवारी 1977 रोजी सोडून देण्यात आले.
गुजरातमधील सुरत मतदारसंघातून देसाई लोकसभेसाठी निवडून गेले होते. नंतर त्यांची सर्वसंमतीने संसदेतील जनता दलाचे नेते म्हणून निवड झाली, आणि 24 मार्च 1977 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.
भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये वयाच्या 84 व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती होते. त्यानंतर त्यांनी सर्व राजकीय पदांवरुन सेवानिवृत्ती घेतली.