2 .अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती – “हुतात्मा अनंत कान्हेरे !”- Anant Laxman Kanhere
(जन्म : १८९१ - मृत्यू : १९१०)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८९१ – मृत्यू : १९१०)
Martyr Anant Laxman Kanhere
जन्म: १८९१ आयनी मेटे, रत्नागिरी
मृत्यू : १९ एप्रिल १९१० ठाणे (फाशी)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
धर्म: हिंदू
प्रभाव विनायक दामोदर सावरकर
वडिल: लक्ष्मण कान्हेरे
वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत कान्हेरे !
कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य ! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !
अनंतरावांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली.
दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती !त्या काळात अनेक गुप्त क्रांतिकारी संस्था काम करत होती. नाशिक, एक गुप्त संघटना, एक हात सदस्य होते. मोजणी वैद्य, आणि समावेश, एकदा, नाशिक, गुप्त क्रांतिकारी संस्था शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरा. हे आहे एक डॉक्टर कान्हेरे द्वारे ओळख झाली. नंतर एक कान्हेरे दिवस मैत्री प्रती मित्र प्रेम नावाने एक कादंबरी लिहिली. कान्हेरे क्रांतिकारी गट, कार्ड आकर्षित होते. सावरकर भाऊ, तो नाशिक येथे अभिनव भारत संघटना स्थापना केली होती. Krishnaji गोपाळ कर्वे करून बाबाराव सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एक गुप्त गट, स्थापना केली होती. या संस्था दुसरा सदस्य विनायक नारायण देशपांडे होते. सावरकर भाऊ, Madanlal Dhingra पासून उत्साही घेणे अनंत कान्हेरे मुंबई सह जिल्हाधिकारी जॅक्सन, आवश्यक आहे जिवे मारण्याचा निर्णय.
- १९ व्या वर्षी यांना फाशी देण्यात आली.
- २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात जॅक्सन ह्या इंग्रज अधिकान्याला गोळ्या झाडून ठार मारले.
- सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कान्हेरे यांनी जॅक्सन याला ठार मारले.
- त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा साथीदारांची जोड मिळाली.
- कान्हेरे यांना अटक करण्यात आली.
जॅक्सनला ठार मारण्याचा कट रचणे
याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.
- कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला.
- २० मार्च १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
- १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांना ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.
- ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे.
- नाशिकमध्ये अनंत कान्हेरे नावाचे क्रिकेट मैदान आहे.
- नाशिकचा कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्या नंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या !
२१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले.
फाशीची शिक्षा
जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी ७ वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटीश सरकारने ठाण्याच्या खाडीकिनारी या तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला आणि त्यांची राखही कोणाला मिळू नये, म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली.
दि. १९ एप्रिल १९१० रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना फाशी दिली गेली. या हौतात्म्य ज्योतीने अनेकांची हृदये प्रकाशमान केली. भारतीय स्वातंत्र्यासाठी या वीरांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण आपणाला भारताचे स्वातंत्र्य टिकवून राष्ट्राला समृद्ध आणि सामर्थ्यशाली करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.
Table of Contents