मनोधैर्य योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
578

मनोधैर्य योजना

 बलात्कार / बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात ‘मनोधैर्य योजना’ सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत दिनांक 02.10.2013 पासून घडलेल्या घटनांतील पिडित महिला / बालकांना लाभ देण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना सुरु केली आहे.

 योजनेच्या प्रमुख अटी :

▪ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस खालील घटनांमध्ये गुन्ह्यांची नोंद (FIR) झाल्यास लाभ अनुज्ञेय ठरतो.
▪ बलात्कार : भा.दं.वि. कलम 375 व 376, 376(2), 376(अ) व 376(ब) प्रमाणे
▪ बालकांवरील लैंगिक अत्याचार : Protection of Children from Sexual Offences Act, 2012 कलम 3, 4, 5 व 6 प्रमाणे व Acid हल्ला : भा.दं.वि. कलम 326(अ) ते 326(ब) प्रमाणे.

आवश्यक कागदपत्रे:

▪ बँक पासबुक झेरॉक्स
▪ घडलेल्या घटनांमध्ये खालील प्रमाणे गुन्ह्यांची नोंद (FIR)

 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप:

• बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख रुपये व विशेष प्रकरणात कमाल 3 लाख रुपये मदत दिली जाते.
• ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रुपये.
• ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झाल्यास महिला व बालकांस 50 हजार अर्थसहाय्य.
• पिडित महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत कायदेशीर सहाय्य, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या आधार सेवा पुरवून त्यांचे पुनर्वसन केले जाते.

 या ठिकाणी संपर्क साधावा:

• जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गुन्हेगारी क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळ.
• जिल्ह्यातील District Trauma Team.

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम