व्यक्तीविशेष : महात्मा जोतिबा फुले

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,277

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.  महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.

दिनविशेष

 महात्मा ज्योतीबा फुले (१८२७-१८९०)

 

जन्म: ११ एप्रिल १८२७ पुणे

मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०

नाव: ज्योतीबा गोविंदराव फुले

मुळ गाव: कटगुण, ता. सटाव, जि. सातारा

आई : चिमणाबाई

वडिल:  गोविंदराव

  • मुळ नाव गोर्‍हे होते, परंतु वडिलांच्या फुलांच्या व्यवसायावरून फुले पडले
  • एक वर्षाचे असताना आईचे निधन.
  • १८३४ वडिल गोविंदरावांनी ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
  • १८३८ गोविंदरावांनी भागका शिकण्यासाठी ज्योतीबांना शाळेतून काढले. ( ४ वर्षात मराठी शिक्षण पूर्ण केले)
  • ज्यांचे शिक्षण परत सुरु करण्यास आग्रह करणारे दोन व्यक्ती
  • १) गफ्फार वेग मुन्शी (२) खिस्ती धर्मोपदेशक मि. लिटि साहेब
  • १८४० वयाचा १३ व्य वर्षी ७ या वर्षाच्या सावित्रीबाईशी विवाह.
  • १८४१-४७ स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण
  • सगुणाबाई (गोविंदरावांची मानलेली बहीण) आई वारल्यानंतर त्यांचा सांभाळ केला.
  • ज्योतीबांच्या विचारावर प्रभाव पाडणारे ग्रंथ :
  • राईट ऑफ द मैन – थोमास पेन  २) वस्त्रसूची – संस्कृत  ३) विप्रमती – कबीर

सामाजिक कार्य: 

  • ३ जुलै १८४८ मूलीची पहिली शाळा बुधवारपेठ – पुणे (तात्यासाहेब भीडेचा वाडा)
  • मूलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी मिस फरार यांच्याकडून प्रेरणा.
  • शाळेतील पहिल्या ६ विद्यार्थिनी –
  • सूमती मोकाशी २) दुर्गा देशमूख  ३) माधवी यते  ४) सोनू पवार  ५) जनी करडीले
  • १८४९ सावित्रीबाईंना शिकवल्याबद्दल घराबाहेर काढले.
  • ३ जुलै १८५१ परत शाळा सुरु केली. बुधवारपेठ – पुणे (अण्णासाहेब चिपळूणकर वाडा)
  • १८५१ अस्पृश्यांसाठी पहिली शाळा – नानासाहेब पेठेत
  • १७ सप्टेंबर १८५१ रास्तापेठेत मूलीची दूसरी शाळा
  • १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत मूलीची तिसरी शाळा.
  • १९ मे १८५२ अस्पृश्यांसाठी शाळा, वेताळपेठ – पुणे (सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा वाडा)
  • १८४८ मराठी जातीच्या मूलांसाठी स्वतंत्र शाळा – बुधवारपेठ (जगत्राव सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने )
  • १८४९ अल्हादाचे घर, नायगाव, शिरवळ, तळेगाव, शिरुर येथे शाळा
  • १६ नोव्हेंबर १८५२ मुंबई प्रांत गव्हर्नर मेजर कॅन्दीतर्फे पुरस्कार विश्रामबाग वाढा. (स्त्री शिक्षणाच्या कार्याबद्दल
  • १८५२ दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केले.
  • १० सप्टेंबर १८५३ महार, मांग लोकास विद्या शिकवण्याकरिता मंडली संस्था काढली.
  • १८५४ स्कॉटीश मिशनन्यांच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी.
  • १८५५ तुकाराम तात्या पडवळ यांच्या जातीभेद विवेकसाराच्या द्वितीय आवृत्तीचे उद्घाटन केले.
  • १८५५ प्रौढ स्त्री -पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केली.
  • १८५५ तृतीय रत्न पहिले नाटक लिहीले.
  • १८५६ सनातनी ब्राह्मणांनी धोंडीराम महादेव कुंभार व सज्जन रोडे यांना फूलेना मारण्याची १०००/- सुपारी दिली.
  • १८५६ फूलेना संपविण्याची सुपारी घेतलेले रोडे हे अंगरक्षक बनले तर थोडीया कुमार सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ बनले.

 

१८५७ च्या उठावास –

१) मट पंडयांचे बंड   (२) फोतूंशी चपाती बंड

अशा शब्दात गौरव केला.

  • १८६३ बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना – पंढरपूर
  • १८६४ पहिला पुनर्विवाह – ८ मार्च १८६४
  • गोखलेच्या बागेत शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह झाला.
  • १८६५ केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप – तळेगाव, ढमढेर
  • १८६७ रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केले व समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे असा अर्ज.
  • १८६८ अस्पृश्यांसाठी स्वतःची विहीर दिली.
  • गोविंदराव यांचे निधन झाले. (१८६८)
  • १८६९: (१) ब्राह्मणांचे फसव हा लिहिला प्रस्तावना यांनी लिहिली.

       २) शिवाजी महाराजांचा पोवाडा – यात  स्वतःचा उल्लेख कुळवाडीभूषण असा केला.

       ३) अखंडवादी काव्यरचना

  • १८७३ गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला (प्रश्नउताराचा स्वरूपात)
  • २४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना – पुणे

ब्रिद वाक्य :  सर्वसाक्ष जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी ।

  • या समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह २५ डिसेंबर १८७३ (सिताराम आल्हाट व राधाबाई निंबकर)
  • १८७३ : १) मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा सुरू
  • अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध
  • काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेची १८६५ मध्ये प्रसूती झाली, तिच्या मुलाला १८७३ मध्ये दत्तक घेतले.
  • ५ जून १८७५ न्या. रानडे यांनी ज्योतीबा फुलेच्या सहकार्याने पुण्यात स्वामी दयानंद यांची हतीवरून मिरवणूक काढली.
  • १८७७ सक्तीच्या शिक्षणाचा ठराव मांडला.
  • व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केले. दिनबंधू वृत्त सुरू केले.
  • दुष्काळ पिडीतांना मदत करण्यास पुढाकार.
  • १८ जुलै १८८० : मद्यपानास विरोध
  • पुण्यातील मद्यपानगृहात वाढ करण्याच्या सरकारी धोरणास विरोध करणारे पत्र मंडळ अध्यक्षाला लिहिले. पुणे नगर पालिकेच्या कार्यकारी
  • पालिकेला दारू गुल्यांवर कर बसविण्यास सांगितले.
  • १८८० नारायण मे, लोखंडे यांनी मिल असोसिएशनची स्थापना केली.
  • १६ नोव्हेंबर १८८२ स्त्री शिक्षणाचे आयजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरव केला.
  • १८७६-१८८२ पुणे नगरपालिकेचे सदस्य होते.
  • ३ फेब्रुवारी १८८२ विल्यम हंटर अध्यक्षतेत आयोग नियुक्त केला.
  • १९ ऑक्टोबर १८८२ इंटर आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन.
  • जुलै १८८८ अर्धांगवायूचा झटका आला. (दॉ. विश्राम रामजी पोले यांनी उपचार केला)
  • १८८३ : १) अस्पृश्यांची कैफीयत लिहिला २) शेतकऱ्यांचा असूड
  • १८८५ सुधारणेचे झाड हे चित्र तयार करून हजारो प्रती शेतकन्यांना फूकट वाटल्या.
  • १८८५ : १) इशारा पुस्तक लिहिले. २) सत्सार १, २ – ब्राह्मी व प्रार्थना समाजावरील टिका
  • १९ जुलै १८८७ स्वतः चे मृत्यूपत्र तयार केले.
  • २ मार्च १८८८ व्हिक्टोरिया राणीचा पूत्र ड्यूक कॅनॉट यांना प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी.
  • दिनबंधू वृत्तपत्र
  • १ मे १८८८ मुंबई मांडवी, कोळीवाडा हॉलमध्ये त्यांना लोकांनी महात्मा पदवी दिली.
  • १ एप्रिल १८८९ खतपोडीचे बंड हा पूर्ण केला.
  • १८८९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी ने प्रकाशन केले.
  • मुंबई काँग्रेसच्या ५ व्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ३० फूट गवताचा शेतकऱ्याचा पुतळा तयार केला.
  • १८८९ राष्ट्रीय समेत शेतकऱ्यांना समावून घेण्याचा अधिकार मागितला.
  • १८८९ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला.
  • २८ नोव्हेंबर १८९० मृत्यू झाला.
  • ३ डिसेंबर २००३ संसदेच्या प्रारंगणात फूलेच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
  • फुलेच्या मते शेतकन्यांचे ३ शत्रू – १) भिक्षुकशाही २) नोकरशाही ३) सावकारशाही
  •  

ज्योतिबांविषयीचे गौरव :

१) राजर्षी शाहू – महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग

२) महर्षी वि. रा. शिंदे –  १) पतितांचा पालनवाला  २) अद्य दलितोद्धारक

३) सयाजीराव गायकवाड –  हिंदुस्थानचा वॉशिंग्टन

४) लक्ष्मणशास्त्री जोशी – महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर – त्यांना Who were the Shudras? हा पंव फूलेंना अर्पण केला.

६) रा. पंढरीनाथ पाटील-  महाराष्ट्रातील पहिला सोशॅलिस्ट

७) महर्षी शिंदे – रानफव्याची उपमा

८) माधव बागल – कार्लमार्क्स महाराष्ट्राचे

९) महात्मा गांधी –  खरे महात्मा ज्योतीबा फूले आहेत.

१०)वि. रा. शिंदे-  ज्योतीबा फूले हे रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्यूनिस्ट होते. रशियन क्रांतीकारक व ज्योतीबांत फरक एवढाच की, एकात अंतःश्रद्धा होती तर एकीकडे बाह्यभूक होती.

(११) लक्ष्मणशास्त्री जोशी – हिंदू समाजातील बहुजन समाजाला जागृत व आत्मावलोकन करायला लागणारा पहिला माणूस.

१२) धनंजय किर – (म. फूलचे परिपत्रकार) ज्योतीबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्या ज्योतीने समता, मानवता, विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला.

१३) धनंजय किर व स. ग. मालशे –

१) महात्मा फुले समग्र वाडमय

२) भारतीय समाजक्रांतीचे जनक

३) भारतीय सामान्य जनतेच्या नवयुगाना प्रेशीत सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल होय.

 

  • महात्मा फुलेंचे संदेश –

१) ज्योतीने ज्योत लावा, एक निरक्षर साक्षर करा.

२) धान हिच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे.

सरकारवर टिका करताना प्रजेने हीत पहात नाही तो राजा कसला?

पंडिता रमाबाईंचा गौरव :  १) सत्शील २) सत्यशोधक साध्विनी

फूलेन चे समकालीन टिकाकार :  विष्णुशास्त्री चिपलूनकर – शूद्र जगद्गुरु व शुद्र धर्मसंस्थापक

-ब्रिटीश सरकारने दक्षिणा प्राईज फंडद्वारे म. फुलेच्या शिक्षण कार्यासाठी मदत केली.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम