दहावीचा निकाल दुपारी १ वाजता, येथे पहा-

Maharashtra SSC Result 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,743

Maharashtra SSC Result 2024

 

 गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान आता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्याने दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार अशी विचारणा विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल तसेच विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रत (प्रिंट) घेता येणार आहे. यावर्षी दहावीच्या तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आले. त्यामुळे बारावीपाठोपाठ दहावीचा निकालदेखील यंदा लवकर जाहीर होत आहे.

 

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

 

 

राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांकडून दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सूत्रानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये गुणपत्रकांचे वाटप केले जाईल तसेच ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने  मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जूनपर्यंत अर्ज करता येईल. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे च्या चौथ्या आठवड्यात जाहीर करू असे म्हटले होते. यानुसार 27 मे ला दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदा 10 वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. एकूण 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
दरम्यान आता या लाखो विद्यार्थ्यांच्या निकाल येत्या तीन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आज आपण निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल कुठे पाहू शकतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

 

निकाल कुठं पाहणार?

जेव्हा दहावीचा निकाल जाहीर होईल तेव्हा mahahsscboard.in,

mahresult.nic.in,

sscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकायचे आहे.
यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट पाहता येणार आहे. ज्यांना ऑफलाइन निकाल बघायचा असेल ते एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहू शकतात.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जायचे आहे. यात MH10 लिहून पुढे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. मग हा मॅसेज तुम्हाला 57766 वर पाठवायचा आहे. हा एसएमएस पाठवल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला SMS केला जाईल.

 

 

 

——————————————————————————————————————————————————————————————— 

Maharashtra SSC Result 2024

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. 

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

 

कला, क्रीडा, सांस्कृतीत, लोककला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या आणि नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जात होती. त्यासह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना जास्तीचे मार्क देण्यात येत होते. विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर देखील याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. आज बारावीचा निकाला जाहीर होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. अशात आता या निर्णयाने विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

 

 

दहावीचा निकाल दुपारी १ वाजता, येथे पहा-

App Download Link : Download App

 

10th Result On 30th May 2024

नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागलीये.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजूनही दहावीच्या निकालाबद्दलची तारीख ही जाहीर करण्यात नाही आली. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आलंय. आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता पुढच्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागेल याची घोषणा ही बोर्डाकडून केली जाऊ शकते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच दहावीच्या निकालाबद्दलचे अपडेट शेअर करतील. 30 मेला दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी एक चर्चा आहे. मात्र, अजूनही बोर्डाकडून दहावीच्या निकालाबद्दलचे कोणतेही अपडेट आले नाहीये.

दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम