शिक्षकांची दीड हजार पदांची जाहिरात निघणार!
Maharashtra Shikshak Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Shikshak Recruitment 2024
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीची जाहिरात येत्या चार दिवसात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांच्या लॉगीनला पाठवण्यात येणार आहे. याला शिक्षण विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २३०० पैकी सुमारे दीड हजार रिक्त पदे म्हणून एकूण पदांच्या ७० टक्के जागा भरण्यात येणार आहेत. मागील काही वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरतीच झाली नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोरोना कालावधीमध्येही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे बीएड्, डीएड् झालेल्या तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले होते. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घेत भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी पावले उचलली. गतवर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली. रोस्टर तपासून भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले होते. जे तरुण या भरतीसाठी पात्र आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याला कालावधीही दिला गेला होता. राज्यातील सर्वच जिल्हा परिषद प्रशासनाकडून ऑनलाईन भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्धीचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेसाठी ८ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पवित्र पोर्टलवर लॉगिन केलेल्या उमेदवारांना जागांची माहिती ऑनलाईन दिली जाणार आहे. ती पुढील चार दिवसात लॉगिनला टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदल्यांच्या सहाव्या टप्प्यात ३०० हून अधिक बदल्या झाल्या. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे दोन हजारावरून २३००वर पोचली आहेत. बदली पात्र शिक्षकांची पदे भरतीत समाविष्ट केली गेली आहेत. एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के पदे भरण्यास शासनाकडून परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार सुमारे १ हजार ५५० पदांची जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑनलाईन कार्यवाही पूर्ण झाली आहे. भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्यामुळे उमेदवाराने लॉगिनला जाऊन माहिती भरावयाची आहे. कोणत्या जिल्ह्यात एकूण किती पदे रिक्त आहेत, आरक्षणनिहाय आकडेवारी त्यामध्ये संबंधितांना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर उमेदवाराकडून संबंधित जागेवर आपली नोंदणी करावयाची आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents