३० हजार पदांसाठी शिक्षक भरती राज्यात लवकरच करणार- मुख्यमंत्री शिंदे
Maharashtra Shikshak Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Shikshak Bharti 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023 : शिक्षकांचे काम हे फार जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आहेत. शिक्षकांनी मोकळेपणाने शिक्षण देण्याचे काम करावे यासाठी शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. सरकारी शाळेवर पालकांचा विश्वास वाढत असून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु, शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. या निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
मराठी बाबत ग्रेडिंगचा पर्याय
शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिली पासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.
शिक्षकांचे सुधारित मानधन – Maha Shikshak Salary
– प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.
– माध्यमिक १८००० रु.
– उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय २०००० रु.
– शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ
मानधन १४००० रु.
– प्रयोगशाळा सहायक १२००० रु.
– कनिष्ठ लिपिक १०००० रु.
– चतुर्थ श्रेणी कर्मचारी ८००० रु.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक 'Share' व 'Like' तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
शिक्षक भरती,
मुख्यमंत्री शिंदे,
Shikshak Bharti,
Maharashtra Shikshak Bharti 2023
Table of Contents