Maharashtra Police Bharti | महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2022
- पदसंख्या: 34
- शेवटची तारीख: 25/12/2022
Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2022
Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2022 : विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र अंतर्गत नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 34
पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 60 वर्षे
नोकरी ठिकाण: नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर – 414001
Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2022 – Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी गट ब | 05 पदे |
विधी अधिकारी | 39 पदे |
Educational Qualification For Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी गट ब | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. |
विधी अधिकारी | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. |
Salary Details For Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी गट ब | विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३,०००/- असे एकुण रू.२८०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत |
विधी अधिकारी | विधी अधिकारी या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू. २००००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३०००/- असे एकुण रू.२३,०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत. |
Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti – Important Documents
- अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे.
- प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत.
- सदर अर्ज लिफाफ्यात घालून उजव्या बाजूला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट ब पदासाठी अर्ज / विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे.
- अर्जासोबत पासपोर्ट साईजचे ०२ फोटो
- शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
- अर्जासोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावे.
How To Apply For Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment
- पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Maharashtra Police Legal Officer Bharti 2022
- सदर पदांची नेमणूक ही पुर्णत: कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवारांना शासकीय अधिकारी/ कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
- सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील. ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवळी ( जास्तीत जास्त ३ वेळा महिन्यांकरीता) वाढविता येईल. त्यानंतर अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे.. असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
- करार पध्दतीने नेमणुक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित वेतन आणि दुरध्वनी व प्रवास खर्चाव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.
- निवड केलेला उमेदवार ११ महिन्याच्या कराराच्या कालावधीत वकीली व्यवसायाशी संबंधीत कोणत्याही प्रकारचे खाजगी काम / व्यवसाय नियुक्ती प्राधिकान्याच्या लेखी परवानगीशिवाय करु शकणार नाही. जर नियुक्ती प्राधिकाऱ्याने सदर बाबतची परवानगी नाकारली असेल आणि परवानगी नाकारल्यावरही उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरु ठेवला असेल व तसे करण्याने शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थीक नुकसान होत असेल तर अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परीक्षेतून जेवढी पदे भरावयाची आहेत त्याच्या तीन पट उमेदवार तोंडी परीक्षेस बोलविण्यात येतील. परीक्षेचा तसेच मुलाखतीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.
- लेखी परीक्षा ५० गुणांची व तोंडी परीक्षा २५ गुणांची असेल. नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६० % गुण असणे आवश्यक आहे.
- लेखी परीक्षा ही कायदेविषयक बाबी उदा. (अ) मा. उच्च न्यायालय, मा. म. प्र. न्यायाधिकरणा समक्ष सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र (ब) सेवाविषयक आणि फोजदारी स्वरुपाची प्रकरणं (क) ला. प्र. विभागाच्या सापळा प्रकरण किंवा फौ. प्र. सं. १९७५ मधील कलम १९७ किंवा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ मध्ये मंजूरीमधील प्रकरणांत अभियोग दाखल करण्यासाठीची परवानगी देणे किंवा न देणे याबाबत निर्णय घेता येणे सुलभ होईल अशा प्रकरणांची छाननी करण्याची क्षमता (ङ) सेवाविषयक किंवा फौजदारी प्रकरणांतील वेगवेगळया महत्वाच्या मुद्यांवर सध्याची न्यायीक स्थिती इत्यादी विषयांवर घेण्यात येईल.
- उमेदवारास कोणताही प्रवासखर्च अनुज्ञेय होणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Maharashtra Police Bharti,
महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी नवीन भरती,
महाराष्ट्र पोलीस भरती,
Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2022
Table of Contents