पोलिस दलात ३२७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे आहेत रिक्त!
Maharashtra Police Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Police Recruitment 2023
रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा आलेख कमी होताना दिसत नाही. दररोज सरासरी सात ते आठ घटना घडत आहेत. उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा मोठा ताण येत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी ३२७ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची २७ पदे रिक्त आहेत.
जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणासह नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. रायगड पोलिस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलिस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र गुन्ह्यांवर नियंत्रण व त्यांचा तपास यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ रायगड पोलिस दलाकडे नाही..
■ पोलिस अधीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांची एकूण २४७ पदे मंजूर आहेत. मात्र, यामधील २७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
■ तर ३०० पोलिस हवालदार, पोलिस नाईक, सहायक फौजदार, पोलिस शिपाई यांची कमतरता पोलिस विभागाला जाणवत आहे.
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents