7231 पदांच्या पोलीस भरतीला मान्यता, जाहिरातीची प्रक्रिया सुरु !!- लवकरच सुरु होणार पोलीस भरती 2022!!
Maharashtra Police Recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti 2022 Maharashtra New Update
Maharashtra Police Bharti 2022: The latest update for Maharashtra Police Recruitment 2022. As per the latest news, The Maharashtra Police Bharti 2022 will begin in Octomber 2022. This is the most waited Maharashtra Police Bharti 2022 from last dew years.
राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. आजच, 21 सप्टेंबर २०२२ रोजी CMO महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर प्रकाशित माहितीनुसार सध्या ७२३१ पदाच्या पोलीसभरतील मान्यता मिळाली आहे. तसेच या भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तेव्हा लवकरच जाहिरात प्रकाशित होणे अपेक्षित आहे.
- येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, मंत्रीमंडळाने या भरतीला मान्यता दिली असून कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितले देखील आहे.
Highlights of महाराष्ट्र पोलीस भरती 2022
विभागाचे नाव | महाराष्ट्र पोलीस विभाग |
एकूण पोस्टची संख्या | |
पोस्ट नाव | पोलीस |
वेतनश्रेणी | 5200 ते 20200 ₹ (ग्रेड पे – 2000 ₹) |
पोलीस शिपाई शैक्षणिक पात्रता | 12 वी पास |
अर्ज पद्धती | ऑनलाईन संकेतस्थळामार्फत |
वय श्रेणी | 19 ते 29 वर्ष |
राज्यात 75 हजार पोलीसांची भरती करण्याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करत पारदर्शीपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेल्या एकूण पदांपैकी सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, भरतीवेळी लेखी परीक्षेपूर्वी अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईमधील 20 मैदानांवर संपूर्ण तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा.
राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे. राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर (पुढील महिन्यात) भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.
Eligibility Criteria ( Mahapolice ) – महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023
- Post Name: पोलीस
- Total Posts: 7231 (6888) Posts
- Job Location: Maharashtra (District Wise)
भरतीचे संभाव्य नियोजन आणि टप्पे …
- ७२३१ पदभरतीला शासनाची मान्यता (नक्षलग्रस्त गडचिरोली भागात २८९ व एसआरपीएफ बल क्र. १३मधील ५४ पदांचा समावेश)
- पहिल्या टप्प्यातील पोलिस शिपाई भरती ऑक्टोबर २०२२ मध्ये होणार
- २०२१ मध्ये पोलिस शिपाई १० हजार ४०४ तर चालक एक हजार ४०१ आणि सशस्त्र पेलिस शिपायांची ७२२ पदे रिक्त झाली असून त्याची दुसऱ्या टप्प्यात भरतीची शक्यता
- २०१९ मध्ये भरती झालेल्यांचे प्रशिक्षण डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होईल; पहिल्यांदा २०२० मधील रिक्त पदांची भरती
- ऑक्टोबरमधील भरती झालेल्यांचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, त्यावेळी २०२१ मधील रिक्तपदांची भरती होईल
Maharashtra Police Bharti 2022
विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक एस. एस. बुरसे (प्रशासन) यांनी बुधवारी यासंबंधी सर्व घटक पोलीस प्रमुखांना आदेश जारी केले आहेत. त्यात विशेष सुरक्षा विभागाने प्रतिनियुक्तीवर येऊ इच्छिणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी ८ ते १८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Maharashtra Police Bharti 2022 Online Form Date (Mahapolice)
Events | Tentative Dates |
Online Application Submission Starting Date | 05/Oct/2022* |
End of Online Application Submission | –/Nov/2022* |
Examination Date of Maha Police Bharti 2022 | –/November/2022 |
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents