CP, Pune City हॉलतिकीट आले, डाउनलोड करा

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
205

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

पोलीस शिपाई भरती शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र CP, Pune City 

  • शारिरीक मोजमाप साठी उपस्थितीची वेळ :- 5:30 am
  • शारिरीक मोजमाप तारीख :- 16 Feb 2023

उमेदवारांसाठी सूचना

  1. पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ची रंगीत फोटो ( Colour Xerox ) असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) ची print ०२ प्रतीत व आवेदन अर्जाची print ०२ प्रत, स्वतःचे पासपोर्ट साईझ ( ५ सें.मी. x ४. ५ सें.मी. ) आकारायचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले ६ फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  3. उमेदवाराने शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक मोजमाप / मैदानी चाचणी / लेखी चाचणी / कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणांसाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  4. शारिरीक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्यावेळी प्रथम अपिल व व्दितीय अपिल करण्याची संधी आहे.
  5. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दि.१५/१२/२०२२ किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
  6. सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता, प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्ठीसाठी विधीग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक १५/१२/२०२२ ( cut off date ) पर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. त्या नुसार आवश्य ती मूळ प्रमाणपत्रे, क्रिडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  7. ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राहय धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल, सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील. भरती निकषाची पूर्तता करत नसल्याचे आढळ्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  8. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन / गैरकृत, भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  9. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा / अपघात / नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारिरीक क्षमता / वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वातोपरी काळजी घ्यावी.
  10. उमेदवारांनी ऑन लाईन अर्ज भरताना दिलेला भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) व ई-मेल कृपया बदलू नये. भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) अथवा ई-मेल वर देण्यात येतील.प्रवेशपत्रावरील फोटो, उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे.
  11. प्रवेशपत्रा तील अर्जदाराची माहिती अर्जदाराने Online अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे सदरहू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील. प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना / निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील, त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरातीत दर्शविलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  12. महिला उमेदवार :- ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी ‘फ’ विवरणपत्र शारीरिक चाचणीपुर्वी उपलब्धकरून देणे आवश्यक आहे. जर त्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अथवा ‘ फ ‘ विवरणपत्र उपलब्ध करून देत नसल्यास त्यांना महिला आरक्षणाचालाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

mahapolice admit card

policerecruitment2022.mahait.org

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट –  How To Download Police Bharti Physical Exam Admit Card

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६)
आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY)
सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

Police Bharti Ground Test Document List – पोलिस भरती ऍडमिट कार्ड सोबत “ही” कागदपत्रे न्यायला विसरू नका, बघा लिस्ट

उमेदवारांनी शारिरीक चाचणी करीता हजर राहतेवेळी मुळ सर्व शैक्षणीक प्रमाणपत्र सोबत आणणेबाबत.

  • उमेदवार यांनी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी हजर राहतेवेळी आवश्यक ती मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • सामाजिक व संमातर आरक्षण
  • क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • एलएमव्ही लायसन्स
  • आवेदन अर्जाची छायांकित प्रत इत्यादी सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे.

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

CP, Pune City,

Police Bharti Physical Test Admit Card,

पोलीस भरतीचे ओळखपत्र

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम