खुशखबर ! राज्यात 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार
Maharashtra Police Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Police Bharti 2023
राज्यात आत्तापर्यंत 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती (Maharashtra Police Recruitment) झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषद लक्षेवेधीवेळी दिली. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती (Maharashtra Police Bharti) तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती झाली असल्याचे सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.
गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पोलिस भरतीची तयारी सुरु, अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना –
पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents