पोलिस भरती झालेल्या ८००० जणांचे १ जुलैपासून! मुंबईतील उमेदवारांचे पुढच्या टप्प्यात ट्रेनिंग

Maharashtra Police Bharti

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,198

सोलापूर : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १४ हजार ९५६ पोलिस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा पार पडली आहे. पण, एकाचवेळी भरती होऊनही नेमणूक वेगवेगळ्या वर्षांत उमेदवारांना मिळणार आहे. त्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. १ जुलैपासून आठ हजार उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु होईल. पुढच्या टप्प्यात मुंबईतील सहा हजार ७४० उमेदवारांचे प्रशिक्षण होईल.

कोरोनाच्या काळातील पोलिस दलाची कामगिरी सर्वांसाठीच संस्मरणीय ठरली. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांचे जीव वाचवले. त्यावेळी अनेकांचा मृत्यूदेखील झाला, अनेकजण सेवानिवृत्त झाले. गृह विभागात सद्य:स्थितीत २५ हजारांवर पदे रिक्त आहेत. आता त्यातील जवळपास १५ हजार पदे भरली जात आहेत. त्यातही पोलिस प्रशिक्षण केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने दोन टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

मुंबईतील सहा हजार ७४० जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवारांचे अर्ज आहेत. अजूनही मैदानीच चाचणी संपलेली नाही. तत्पूर्वी, सर्वच जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा संपली आहे. चालक पदांचा निकाल देखील जाहीर झाला असून आता काही दिवसांत शिपायांचीही निकाल लागेल. त्यांचे प्रशिक्षण १ जुलैपासून राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांवर सुरु होईल. नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या उमेदवार त्याठिकाणी जातील. तत्पूर्वी, पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता साडेसहा हजारांवरून आठ हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यात सोलापूर, नाशिकसह इतर पोलिस प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी नाहीच

कुटुंब आणि नोकरी, अशा दुहेरी भूमिकेतील महिला पोलिस अंमलदारांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय सव्वावर्षापूर्वी झाला. पण, अजूनही निम्म्यापेक्षा जास्त शहर-जिल्ह्यात तो लागू झालेला नाही. त्याला प्रमुख अडथळा म्हणजे अपुरे मनुष्यबळ हेच आहे. राज्यातील बहुतेक शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्या देखील वाढली आहे. गुन्ह्यांची संख्या दरवर्षी सरासरी ९ ते १० टक्क्यांनी वाढत आहे. तरीपण त्यांचे वर्षातील ३६५पैकी दोनशेहून अधिक दिवस बंदोबस्तातच जातात. रिक्तपदांमुळे ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सद्य:स्थितीत ३० टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस अधिकारी, अंमलदारांना बीपी, शुगरचा त्रास आहे. आता पोलिस भरती झालेले उमेदवार दाखल झाल्यावर थोडा ताण कमी होईल.

१ जुलैपासून सुरू होईल पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण

मुंबईतील पोलिस भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात होईल. तत्पूर्वी, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांचे प्रशिक्षण १ जुलैपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. राज्यातील दहा प्रशिक्षण केंद्रांमध्ये आठ हजार उमेदवार प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे.

– राजकुमार व्हटकर, अप्पर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलिस भरती,

Maharashtra Police Bharti,

Devendra Fadnavis,

Nashik,

police,

pune,

maharashtra,

Mumbai,

Recruitment,

Eknath Shinde

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम