खुशखबर! अंगणवाड्यांमध्ये लवकरच होणार १३ हजार पदांची भरती!!

Maharashtra Anganwadi Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,243

Maharashtra Anganwadi Recruitment 2024

अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे. राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून ७५ हजार पदांच्या शासकीय मेगाभरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे. त्यामुळे अनेकजण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारस पत्र आणत आहेत. दरम्यान, गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले. ते शिफारस पत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले. पण, आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ९०१ मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील १३ हजार सात मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये आता नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. गावागावांतील इयत्ता बारावी उत्तीर्ण १३ हजार तरुणींसह महिलांना त्याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील साधारत: ९०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

२५ ते ३० अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षक नेमला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागाअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या आहेत. त्यांच्यावरील देखरेखीसाठी सध्या ९२ पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या प्रमाणात १३५ पर्यवेक्षिका जरुरी असून अद्याप ४३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीसंदर्भातील निर्णय अजूनही प्रलंबित असून काही दिवसांत त्या पदांचीही भरती होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 


अंगणवाडी सेविका, अंगणवाड्यांतील ११ हजार ७३१ पदे रिक्त-

Maharashtra Anganwadi Recruitment 2024

 

राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणा-या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरांवर पहिल्या टप्प्यात मदत देणा-या अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र या गटातील राज्यात ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे.

या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही स्तरांवर पहिल्या टप्प्यात मदत देणाऱ्या अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र या गटातील राज्यात ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत.

पोषण आहार, आरोग्य तपासणी, कुपोषणाच्या निर्मूलनासाठी वजन घेणे, त्यांच्या नोंदी ठेवणे या महत्त्वाच्या कामांना त्यामुळे वेग येत नाही. या रिक्त पदांवर सरकार केव्हा नेमणुका करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे रिक्त पदांमुळे सेवा देण्यात अडचणी येतात. परिणामी या ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण आहे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

खुशखबर! अंगणवाड्यांमध्ये लवकरच होणार १३ हजार पदांची भरती!!

App Download Link : Download App

कुपोषण व बालमृत्यू यांचा परस्पराशी संबध नाही असा दावा यंत्रणांकडून केला जातो. मात्र कुपोषित मुलांमध्ये संसर्ग व त्यामुळे निर्माण होणारी आरोग्याच्या संदर्भातील गुंतागुंत यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. यासंदर्भात माहिती मागितली असता ती दिली जात नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत बालमृत्यूची माहिती प्रत्येक महिन्याला देणे अपेक्षित असले तरीही ही माहिती अपलोड केली जात नाही. यावर्षी एप्रिल, मे आणि जूनमधील माहिती देण्यात आलेली नाही.

 

मिनी अंगणवाड्यांची समस्या
अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. मात्र राज्यातील ५५३ प्रकल्पांत १,१०,४४४ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या ९७,४७३ तर १२,९७१ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर २०२३च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिका-यांची एकूण ११,७३१ पदे रिक्त आहेत.

 

अंगणवाड्यामध्ये लहान मुलांच्या शिक्षण व आरोग्य या दोन्ही पातळ्यांवर काळजी घेतली जाते. मात्र राज्यातील ५५३ प्रकल्पांत १,१०,४४४ अंगणवाड्या असून त्यात मुख्य अंगणवाड्यांची संख्या ९७,४७३ तर १२,९७१ मिनी अंगणवाड्या आहेत. त्यामधील रिक्त पदांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. या अंगणवाड्यांमध्ये ११ हजार ७३१ पदे रिक्त आहेत. ऑक्टोबर २०२३च्या आयसीडीएसच्या अहवालानुसार राज्यात अंगणवाडी मदतनीस ते बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण ११,७३१ पदे रिक्त आहेत.

 

पदनाम/ रिक्त पदे

  • अंगणवाडी सेविका ५,०१५
  • मिनी अंगणवाडी सेविका ४४८
  • मदतनीस ४,५६४
  • अंगणवाडी पर्यवेक्षिका १,३९५
  • बालविकास प्रकल्प अधिकारी ३०९

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम