ठाणे वनरक्षक मैदानी चाचणी 20 फेब्रुवारी पासून, परिपत्रक प्रकाशित!

MahaForest Recruitment 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,258

MahaForest Recruitment 2024

 

वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोठ्यातील बनरक्षक या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे (एकुण १२० पैकी) आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादीनुसार ४५ % व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी संकेतस्थळावर प्रसिध्द केल्यानुसार सूरू आहे. त्यानुसार ठाणे बनवृत्तात धाव चाचणी दि.२०.०२.२०२४ ते २७.०२.२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सर्व संबधित उमेदवारांना धाव चाचणीकरीता वेळापत्रकानुसार विहित वेळेत उपस्थित राहणेबाबत भ्रमणध्वनी संदेशाद्वारे आपले स्तरावरून NIC मार्फत फळविण्यात यावे, ही विनंती.

 

ठाणे वनरक्षक मैदानी चाचणी 20 फेब्रुवारी पासून, परिपत्रक प्रकाशित!

 

वन विभागाच्या ७३ जागांसाठी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत  भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर मैदानी चाचणीची प्रक्रिया ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान शेंद्रा येथे नियोजित होती. महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, ती अचानकपणे बदलण्यात आली. त्यानंतर काहींना ई-मेल तर काहींना फोन करीत ही चाचणी ८ फेब्रुवारीला घेण्यात आली. दरम्यान, अनेक उमेदवारांना फोन आला नसल्याने जवळपास १४८ उमेदवार या चाचणीपासून वंचित राहिले आहेत. वन विभागाने ७३ जागांसाठी दिवाळीदरम्यान परीक्षा घेतली. त्यानंतर या महिन्यात पाच किलोमीटर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे. यात महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या.

२२ जानेवारीला हॉलतिकीट वाटप करण्यात आले. त्याचवेळी महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली होती. मात्र, अचानक ५ ऐवजी ८ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्याचा ई-मेल महिला उमेदवारांना पाठविण्यात आला. काहींना फोन करण्यात आल्याचा दावा वन विभागाने केला. या मैदानी चाचणीपासून १४८ उमेदवार वंचित राहिले. काही महिला उमेदवार पाच तारखेला आल्या. त्यांना पुन्हा ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. ९ फेब्रुवारीला कुठलीही चाचणी झाली नाही. यामुळे यातील काही उमेदवारांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या. एजन्सीचे नियोजन नसल्याने हा फटका बसला आहे.

ज्या महिला उमेदवारांच्या हॉलतिकिटांवर ९ फेब्रुवारीची तारीख वन विभागाने लिहून दिली, त्यांच्या तक्रारी आल्या. आता त्यांची १५ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक एच.जी. धुमाळ यांनी सांगितले.

मात्र, ही माहिती त्या उमेदवारापर्यंत पोचली, की पुन्हा पहिल्यासारखे राहील हे अजूनही स्पष्ट नाही. अनेक उमेदवारांना नेटवर्कची समस्या असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना संपर्क कसा साधणार, याचीही स्पष्टता वन विभागाकडे नाही.

 

ठाणे वनरक्षक मैदानी चाचणी 20 फेब्रुवारी पासून, परिपत्रक प्रकाशित!

App Download Link : Download App

 

त्या १०० उमेदवारांचे काय?
१,८०० पैकी १४८ उमेदवार मैदानी चाचणीसाठी योग्य माहिती न मिळाल्याने येऊ शकले नाहीत. त्यातील ४८ उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी होणार आहे. १०० उमेदवारांचे यात नुकसान होण्याची शक्यता आहे. याविषयी वन विभागाचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत.

महिला उमेदवारांसाठी ८ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेतली. यात १,८०० पैकी १४८ गैरहजर होते. जे काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांना ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. त्या उमेदवारांसाठी आता १५ फेब्रुवारीला चाचणी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्वांना आम्ही कळविणार आहोत. परीक्षा पारदर्शक होत आहे.

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम