खुशखबर राज्याच्या वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर!

MahaForest Recruitment 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
412

MahaForest Recruitment 2022

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण वेळापत्रक पहा   

 

मागील अपडेट्स 

  • वनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे.
  • त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे.
  • डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे.
  • ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे.
  • वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे.
  • विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत.

एका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीची फाईल धूळखात

वनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल.

– सुधीर मुनगंटीवार, वन मंत्री महाराष्ट्र

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम