MahaForest Bharti 2022 Update – वनरक्षक भरती 2022 लांबणीवर जाहिरात १५ जानेवारी पर्यंत येणार!

वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
7,722

MahaForest Bharti 2022 | MahaForest Recruitment 2023

MahaForest Bharti 2022 Update :वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

 

वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.

तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत
MahaForest Bharti 2022 Update
MahaForest Bharti 2022 Update

 

Van Vibhag Bharti 2023

मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव, अपर मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, शोमिता विश्वास यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  • मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाने या वर्षात ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यात वन विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरली जावीत, यादृष्टीने वन विभागाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्याची गरज आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या अनुषंगाने विभागाने तातडीने मागणी त्यांच्याकडे नोंदवून पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
  • ज्या पदांची भरती टीसीएस या त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आहे, ती कार्यवाही विभागाने तत्काळ सुरु करावी.
  • पदभरतीच्या प्रक्रियेत वन विभाग कुठेही मागे राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Van Vibhag Recruitment 2023

वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वन सांख्यिकी ही पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. त्याचबरोबर, लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रियाही आता लोकसेवा आयोगामार्फत राबविली जाणार आहे. मात्र, इतर वर्ग-३ पदांच्या भरतीबाबत वन विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. पदभरतीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची सोडवणूक करुन वन विभाग या भरती प्रक्रियेत आघाडीवर राहील, यासाठी यंत्रणेने विहित वेळेत प्रक्रिया मार्गी लागेल, हे पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Van Vibhga Bharti Details

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

रिक्त पदांचा पूर्ण तपशील पहा

वनरक्षक भरती बातमी पहा

Van Vibhag Timetable

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. 

Van Vibhag Bharti 2022 Date Declared

MahaForest Bharti 2022 Update - वनरक्षक भरती 2022 लांबणीवर जाहिरात १५ जानेवारी पर्यंत येणार!

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MahaForest Bharti 2022 Update,

MahaForest Recruitment 2023,

Van Vibhag Bharti 2023,

Van Vibhag Recruitment 2023,

वन विभाग भरतीचे वेळापत्रक,

वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक,

वन विभाग भरती

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम