ladki Bahin Yojana Update – खुशखबर! लाडक्या बहिणींची दिवाळी गोड, मिळणार तीन हजार बोनस
ladki bahin yojna update diwali bonus
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
खुशखबर! लाडक्या बहिणींची दिवाळी गोड, मिळणार तीन हजार बोनस
ladki bahin yojna update diwali bonus
ladki Bahin Yojana Update : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले होते.त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली होती.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महायुती सरकारनं राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार आहे. राखी पौर्णिमेच्यापूर्वी या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला. आत्तापर्यंत तीन हप्ते DBT च्या माध्यमातून खात्यात जमा झाले आहेत
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2024 होती. ती वाढवून 15 ऑक्टोबर 2024 करण्यात आली. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला. अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपयांचा बोनस जमा होणार आहे. त्याचबरोबर काही निवडक महिला आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.
500 रुपये अतिरिक्त जमा होणार
‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात आला आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होईल.
दिवाळी बोनस मिळवण्यासाठी पात्र अटी काय आहेत ते पाहूया
- महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत हवं
- योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतला असेल
- महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक हवे.
या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
कोणत्या महिलांना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार?
3000 रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ या महिला वर्गासाठी उपलब्ध आहे.
- दिव्यांग महिला
- एकल माता
- बेरोजगार महिला
- दारिद्ररेषेखालील महिला
- आदिवासी भागातील महिला
मागील अपडेट
Ladaki Bahin Yojana 2024 – लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार?
Ladki Bahin Yojana : आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. परंतु, अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तेर आज जाणून घेउयात.
Ladki Bahin Yojana Q & A: महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योनजेसाठी राज्यभराली कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तर, आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. परंतु, अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तेर आज जाणून घेउयात.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरू शकतो का?
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरायचे होते. परंतु, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंतही अनेक महिलांनी अर्ज भरले नसल्याने ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर आताही अर्ज भरू शकता.
या योजनेसाठी जॉइंट अकाऊंट चालेल का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा याकरता या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.
सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये येणार?
ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळणार की एक महिन्याचेच मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. मात्र, याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावर महिलांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे का आले नाहीत?
अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. परंतु, अद्यापही पैसे आलेले नाहीत, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तत्काळ लिंक करून या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडावेळी प्रतिक्षा करू शकता, असं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलं आहे.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
Ladaki Bahin Yojana , ladki Bahin Yojana Update , ladki Bahin Yojana Update
Table of Contents