केशव बळीराम हेडगेवार यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८८९- मृत्यू : १९४०)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
केशव बळीराम हेडगेवार यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १ एप्रिल १८८९
ठिकाण : नागपूर
पुर्ण नाव : केशव बळीराम हेडगेवार (रेवतीबाई)
टोपन नाव : डॉ. हेडगेवार
मृत्यू : २१ जून १९४० (नागपूर)
प्रमुख स्मारके : डॉ. हेडगेवार स्मारक, नागपूर ( समिती)
प्रभाव : बाळकृष्ण शिवराम मुंजे, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज
प्रभावित : माधव गो. विलकर, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी
संस्थापक : संघटना – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RRS) – १७ सप्टेंबर १९२५
चळवळ : हिंदू धर्म पुनरुज्जीवन बाद व सुधारणा
- केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म बळीराम व रेवतीबाई (पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई पैठणकर) या दांपत्यापोटी नागपूर येथे झाला.
- त्यांचे मूळ घराणे आंध्र प्रदेशातील असून केशवरावांचे पणजोबा नरहरशास्त्री हे अठराव्या शतकात नागपुरात येऊन नागपूरकर भोसल्यांच्या आश्रयाखाली स्थायिक झाले.
- अध्ययन व अध्यापन ही या घराण्याची परंपरा असून केशवरावांनी व्यवहारापुरते वेदविद्येचे शिक्षण घेतले होते. त्यांना दोन वडीलबंधू आणि तीन बहिणी होत्या.
- आई-वडिलांचे प्लेगने एकाच दिवशी निधन झाले (१९०३).
- घरात पैलवानी परंपरा असल्याने केशवरावांनी त्या विद्येत प्रावीण्य मिळविले होते.
- इतर अनेक मर्दानी खेळांतही ते प्रवीण होते.
- त्यांचे क्रांतिकारक आचार-विचार व वंदेमातरम्चा उद्घोष केल्याप्रकरणी त्यांना शाळेतून निष्कासित करण्यात आले.
शिक्षण
- गोल बंगला प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबात एखादा तरी मुलगा आंग्लविद्याविभूषित असावा म्हणून त्यांना नील सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी दाखल केले (१९०१).
- १९१० वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकत्याला गेले.
- नॅशनल मेडिकल कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी एल्. एम्. अँड एस्. ही वैद्यकीय पदवी मिळविली (१९१४) आणि तत्संबंधीचा अनिवार्य प्रायोगिक अभ्यासक्रमही पूर्ण करून वैद्यकीचे प्रमाणपत्र प्राप्त केले (१९१५).
- विद्यार्थिदशेत असतानाच स्थानिक क्रांतिकारक गटांशी, विशेषतः पुलिन बिहारी दास यांच्या समितीशी त्यांची जवळीक वाढली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
- डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली.
- त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
- क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली.
- चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते.
- त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते – कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले.
- इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.
- सशस्त्र क्रांतीत सहभाग
- वंदे मातरम् ही घोषणा केल्याबद्दल शाळेतून काढून टाकले.
- अनुशिलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते,
- सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पन भावना, दुरदर्शी विचार, शिस्तबद्ध निश्चित व व्रतस्थ ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची विविध अंगे होती.
- गांधीजी मुस्लीमाशी सहकार्य करण्याची इच्छा नाकारल्याबद्दल RSS ने नकार दिला.
- हेडगेवार वैयक्तीकरित्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले.
- स्वातंत्र्य चळवळीला RSS चा सहभाग मिळाला नाही.
- प्रथम बंदी – १९४७ पंजाब प्रांतात
- भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला विरोध
- राष्ट्रीय ध्वजाचा रंग भगवा ठेवण्याची मागणी.
- डॉ. बाळकृष्ण मुंजे यांना हेडगेवार गुरुस्थानी मानीत.
- डॉक्टर व संघ यांना मुंजेंचा आधार होता.
- तसेच बाबाराव व नारायणराव हे सावरकर बंधू, बापूजी अणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नृसिंह पाचलेगावकर महाराज आदी निकटवर्तीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
- डॉ. हेडगेवार हे नव्या हिंदुराष्ट्रवादाचे जनक आणि सुप्त हिंदुराष्ट्राचे प्रबोधक मानले जातात. वि. दा. सावरकरांनी त्यांना हिंदुराष्ट्रवादाचा आधारस्तंभ म्हटले आहे.
- सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना, दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती.
- दिनांक २१ जून , इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले.
- संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झाली. आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली शिदोरीच जणू त्यांनी संघाला अर्पण केली.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents