काशीबाई कानिटकर (1861-1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८६१ - मृत्यू : १९४८)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,809

काशीबाई कानिटकर या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.

काशीबाई कानिटकर (1861-1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती 

काशीबाई कानिटकर
काशीबाई कानिटकर

जन्म : १८६१ (आष्टे सातारा)

वडिलांचे नाव : कृष्णराव बापट (मामलेदार )

  • १८७७ विवाह (गोविंदराव कानिटकरांशी)
  • काशीबाईंनी शिक्षणाची सुरवात जॉन स्टुअर्ट मिल यांचे Subjection of women liberation या पुस्तकाचा अर्थ समजावून केली. (गोविंदरावांची मदत)
  • १९२९ ह. ना. आपटे यांची पत्र काशीबाईंनी प्रकाशित केली.

जीवन

काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला.

गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या. 

काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.

काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या.

काशीबाई कानिटकरांच्या कादंबऱ्या :

१) रंगराव १९०३                               २) पालखीचा गोंडा १९२८

  • १८८९ मध्ये काशीबाईने आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहले –
  • काशीबाईंच्या पहिल्या कथालेखिका म्हणून उल्लेख –

प्रकाशित कथासंग्रह  –  चांदण्यातील गप्पा

काशीबाई कानिटकर (1861-1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
काशीबाई कानिटकर (1861-1948) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते. १९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव कानिटकर अध्यक्ष होते.

त्या संमेलनाला त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. १९०९ मध्ये वसंत व्याख्यानमालेत काशीबाई अध्यक्ष होत्या.

त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ठरल्या. पुणे सेवासदन संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. रमाबाई रानडे सेवासदनच्या अध्यक्षा तर काशीबाई उपाध्यक्षा होत्या.

पंडिता रमाबाईंबरोबर काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाला हजर असणाऱ्या आठ महिला सदस्यांपैकी महाराष्ट्रातील एकमेव हिंदू महिला-काशीबाई उपस्थित होत्या. त्या थिऑसॉफिस्ट होत्या. त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे काशी येथे ब्रह्मचिंतनात घालवली.

कथा संग्रह

  • शेवट तर गोड झाला
  • चांदण्यातील गप्पा

प्रकाशित कथासंग्रहाचे शिर्षक :

१) शिसवी पेटी            २) मारुतीचा प्रसाद             ३) वनवास

४) सारसबाग               ५) लावण्यवती                  ६) धर्मजागृती

  • पुर्वीच्या स्त्रिया हल्लीच्या स्त्रिया – पतीच्या आग्रहास्तव निबंध काशीबाईंनी लिहीलेला आहे. सुबोधपत्रिकेत प्रकाशित
  • मृत्यू ३० जानेवारी १९४८

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम