1. “ताराबाई मोडक” यांच्याबद्दल संपूर्ण माहिती (जन्म : १८९२ – मृत्यू : १९७३)

(जन्म : १८९२ - मृत्यू : १९७३)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
654

ताराबाई मोडक यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८९२ – मृत्यू : १९७३)

जन्म : १९ एप्रिल १८९२

टोपण नाव : ताराबाई मोडक

गाव : इंदूर

वडिल :  सदासीव पांडुरंग केळकर :

आई : उमाबाई

मुंबईत : एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागल्या (अलेझांड्रा गर्ल्स हाय स्कूल)

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या चाकण (जि. पुणे) येथील केळकर घराण्यातील. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे उमाबाई. वडील सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिक आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. आईही स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडीलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत मुंबई येथे त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन १९१५ मध्ये त्यांचा नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह झाला. त्याला दोन्ही घरच्या लोकांचा विरोध होता. कृष्णा मोडक अमरावती येथे वकिलीव्यवसाय करीत. त्यांना प्रभा ही मुलगी होती. पुढे ताराबाईंचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी वास्तव्य झाले.

ताराबाई मोडक यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

  • १९०९ मॅट्रीक पास
  • १९१४ फिलॉसॉफी घेऊन बी. ए. पास
  • १९१५ ताराबाईंचे के. व्ही. मोडक यांच्याशी लग्न.
  • १९१५ अमरावतीय मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरु केले.
  • १९१६ एम. ए. पास नाहीत.
  • १९२१ राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य
  • पुण्यात मुलींच्या शाळेत शिक्षीका.
  • १९२६ नुतन बालशिक्षण संघ संस्थेची स्थापना (मॉन्टेसरी संघाची स्थापना)
  • १९३१ नंतर ताराबाईनी अमरावतीला येऊन हरिजन सेवा संघातर्फे बालवाडी महिला, महिला मंडळ, साक्षरता प्रसार आदी कामे केली.
  • प्रशिक्षीत शिक्षक बालकांना मुल्यसंस्कार देऊ शकतात अशी त्यांची धारणा असल्याने उत्तम शिक्षक घडविण्यासाठी जीवन मंदीर ची स्थापना.
ताराबाईंनी (Tarabai) गिजुभाईंच्या मृत्यूनंतर पुढील १२ वर्षे नूतन बालशिक्षण संघाची धुरा वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होते. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतिने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालविण्यासाठी १९४५ मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम करण्यात आला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ (Anutai Wagh) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. १९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलविण्यात आले. ताराबाईंनी कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोग सुरू केला. प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न होता. मुले शाळेत हजर राहावे म्हणून ताराबाईंनी गृहभेटी, प्रचार फेऱ्या, दिंडी, मुलांसाठी बैलगाडीची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविले. त्याचबरोबर भातशेती ह्या मूलोद्योगाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, भाषा हे विषय शिकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात गोडी देखिल वाटू लागली; परंतु धान्याच्या पेरणीनंतर सहा ते दहा वयोगटातील आदिवासी मुले व काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न पुन्हा ताराबाईंपुढे निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्याला कुरणशाळा (Meadow School) असे नाव दिले. शहराच्या ठिकाणाहून कोणतेही शैक्षणिक साधने न आणता त्यांनी विद्यार्थ्यांना रंग, स्पर्श, वजन मापन, अंक, आकार इत्यादी संकल्पना समजावे यांकरिता पिसे, बांगळ्या, शंख, दगडं, बिया, माती, रेती, बांबुफळे, डब्या इत्यादी स्थानिक वस्तूंचाच वापर केला. ताराबाईंनी १९५८ मध्ये आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या कुरण शाळा प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे. पुढे १९७४ मध्ये भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरणशाळा (मराठी) मेडोस्कूल (इंग्रजी) या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतली.
  • १९३३ ताराबाईंनी शिक्षण पत्रीका काढावयास सुरुवात केली.
  • १९४५-५७ या काळात ग्रामीण बाल शिक्षणाचे कार्य त्यांनी बोडी येथे केले.
  • सकस आहार योजना, पुरक अन्न योजना, कुरण शाळा, रात्र शाळा, शबरी उद्योगालय प्रौढ शिक्षण वर्ग हे उपक्रम राबविले
  • १९४६ मुंबई विधीमंडळावर निवडून गेल्या होत्या.
  • १९६२ पद्मभुषण हा किताब त्यांना केंद्र सरकारने दिला.
  • मृत्यू: ३१ ऑगस्ट

ताराबाई मोडक

  • ताराबाई मोडक या एक मराठी भाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात.
  • संदर्भ: पद्मजा फाटक शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक मुंबई १९८१.
  • लेख नदीची गोष्ट, बालकांचा हट्ट, बालविकास व शिस्त, बिचारी बालके, सवाई विक्रम

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम