Importance of Newspapers | स्पर्धापरीक्षांमधे वृत्तपत्रांच्या अभ्यासाचे महत्व !!!
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Importance of Newspapers | स्पर्धापरीक्षांमधे वृत्तपत्रांच्या अभ्यासाचे महत्व !!!
सर्वप्रथम वृत्तपत्रातील अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे लेख आणि संपादकीय बाबींचे प्रामुख्याने वाचन करावे. वृत्तपत्रातील लेख दृष्टिकोन पुरवणारे, विषयाचे विविध आयाम स्पष्ट करणारे असतात. प्रथम वाचनातच संबंधित लेखाचे आकलन व्हावे ही अपेक्षा चुकीची ठरते. सुरुवातीला 10-20 टक्क्यांवर समाधान मानायला हरकत नाही. सातत्याने वाचन करीत राहिल्यास पुढे काही कालावधीनंतर लेखांचे समग्र आकलन व्हायला वेळ लागणार नाही. लेख वाचून त्यातून महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढावेत किंवा सारांश लिहून काढावा. आपण लिहून काढलेले सारांश पुन्हा एकवार संपादित करून अधिक बंदिस्त आणि गोळीबंद करावेत. ही प्रक्रिया दैनंदिन स्वरूपाची आणि सातत्यपूर्ण असायला हवी. परिणामी, या प्रक्रियेद्वारे आकलनाच्या जोडीला लेखनकौशल्ये विकसित करण्याची संधीही प्राप्त होते. मुख्य परीक्षेकरता वर्तमान घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्रातील संपादकीय पानाचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents