१०,००० पदांची होमगार्ड भरतीला लवकरच सुरवात होणार, लागा तयारीला!

Home Guard Bharti 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
366

Home Guard Bharti 2024


१०,००० पदांची होमगार्ड भरतीला लवकरच सुरवात होणार, लागा तयारीला!Home Guard Bharti 2024 Updates – पुण्यासह राज्याच्या नागरी संरक्षण दलात (होमगार्ड) तब्बल दहा हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हानिहाय भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. हे मनुष्यकाळ येत्या डिसेबरपर्यंत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दहा हजार महित्य पुरुषांना संधी मिळणार आहे.

आपत्कालीन परिस्थिती तसेच प्रमुख उत्सव, मिरवणुका आणि राजकीय नेत्यांच्या सभांच्या वेळी बंदोबस्तात पोलिसांना साहाय्य म्हणून होमगार्ड महत्वाची भूमिका बजावतात, पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात होमगार्ड पांचो मंजूर संख्या चार हजार इतकी आहे, परंतु सध्या केवळ बावीसशे होमगार्ड कार्यरत आहेत. जिल्ह्यात अद्याप अठराशे, तर राज्यात सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत. या पदांसाठी भरती प्रकीया लवकरच सुरु होण्याचे संकेत आहे. 

तसेच मानधनाबाबतच्या संदर्भात पोलिस महासंचालक (होमगार्ड) रितेश कुमार म्हणाले, “राज्यात होमगार्डची दहा हजार रिक्त पदे भरण्यात येत आहेत. जिल्हानिहाय भरती प्रक्रिया सुरू आहे. याबाबत राज्यातील जिल्हा समादेशकांना (अतिरिक्त पोलिस अधीक्षक) सूचना दिल्या आहेत.” दरम्यान, होमगार्डच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे विचाराधीन आहे.

पोलिसांच्या खांद्याला खांदा त्पवून होमगार्ड कर्तव्य बजावत असतात. त्यांना बंदोबस्तासाठी दिवसाचे केवळ ५७० रुपये मानधन मिळते. याशिवाय दैनदिन भोजनभत्ता केवळ शंभर रुपये आहे. त्यामध्ये वाद होण्याची गरज आहे. त्यानुसार होमगार्डना एक हजार ते बाराशे रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दम्यान, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी होमगार्डच्या संबंधित जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

Home Guard Bharti 2024

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम