शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
186

शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती

 राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावरील संवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयामध्ये पी. एच्. डी. करता यावी, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

 योजनेच्या प्रमुख अटी :

▪शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत प्राप्त आवेदनपत्रांची छाननी करू न गुणवत्तेनुसार विहित तीन संचांची निवड केली जाते.
▪ महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यांनी गठित केलेल्या समितीमार्फत पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून त्यांना विहित केलेल्या संचास अधिन राहून प्राचार्यांकडून निवड केली जाते.
▪ या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
▪ संबंधित छात्र कोठेही सेवेत नसावा. तसेच त्यांनी इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
▪ संबंधित विद्यार्थ्याने पी. एच्. डी. संबंधी विद्यापीठामध्ये रीतसर नोंदणी करू न संबंधित मार्गदर्शकाने शिफारस करणे आवश्यक आहे.
▪ महाविद्यालयीन स्तरांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून विहीत केलेल्या संचाच्या अधीन राहून प्राचार्यांमार्फत निवड केली जाते.
▪ विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
▪ सदर शिष्यवृत्ती चे राज्य स्तर 3 व महाविद्यालयीन 11 संच आहेत.

आवश्यक कागदपत्रे :

1. विहित नमुन्यातील आवश्यक कागदपत्रे
2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
3. अधिछात्राची त्याच्या मार्गदर्शकामार्फत त्याचा वार्षीक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक.

 लाभाचे स्वरूप असे :

पी. एच्. डी प्रतिवर्ष 9 हजार रुपये व 1 हजार रुपये सादीलवार खर्च रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ इंडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा केली जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा :

उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम