गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (1823 – 1892)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८२३- मृत्यू : १८९२)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नाव : गोपाळ हरी देशमुख (मुळ अडनाव सिद्धय)
जन्म: १८ फेब्रुवारी १८२३, पुणे
मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२
वडील : बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते वतनावरून ते देशमुख होते.
- सरदार गोपाळ हरी देशमुख घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते.
- घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
- गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.
- गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती.
- इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता.
- त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.
- १८४१ इंग्रजी शाळेत प्रवेश, इतिहास आवडता विषय होता. संस्कृत, फारशी, गुजराती, हिंदी भाषा अवगत.
- १८४४ भाषांतरकार म्हणून नोकरी.
- १८४६ मुन्सीफची परीक्षा उत्तीर्ण
- १८४८ प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे ही लेखमाला प्रसिद्ध.
- १८४८ पुणे नेटीव्ह जनरल लायब्ररी स्थापन.
- १८५२ फर्स्ट क्लास मुन्सक म्हणुन वाई येथे नियुक्ती.
- १८५६ असिस्टंट कमिशन पदावर नियुक्ती.
- १८६२ अहमदाबादला असिस्टंट जज, अहमदनगरला जज म्हणून नियुक्ती.
- १८६३ सनदी परीक्षा उत्तीर्ण, नाशिकला जॉइंट सेशन जज.
- ५ जून १८६९ मुंबई विनायकराव करमकर व वेणुबाई यांचा जो पुनर्विवाह झाला. त्यांच्या समर्थ तीर्थ जे पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात गोपाळराव देशमुख यांचेही नाव.
- १८७९ जस्टिस ऑफ पिस, रावबहादूर पदवीने सन्मानित.
- १८८० मुंबई विधिमंळाचे सदस्य, रतलाम संस्थानाचे दिवाण
- १८८२ लोकहितवादी (मासिक) सुरु
- १८८३ लोकहितवादी (त्रेमासिक) सुरु
लोकहितवादी यांनी सुरू केलेले वृत्तपत्र :
वृत्तपत्र स्थापना ठिकाण
मित्रोदय १८४४ पुणे
ज्ञानप्रसारक १८५३ कोल्हापूर
वर्तमान संग्रह १८५३ कोल्हापूर
जगन्मित्र १८५४ रत्नागिरी
परशु १८५६ जमखिंडी
शुभसूचक १८५८ सातारा
लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य
- इतिहास : (एकूण १० पुस्तके)
- भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
- पाणिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
- ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
- ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
- ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
- हिंदुस्थानचा इतिहास – पूर्वार्ध (१८७८)
- गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
- लंकेचा इतिहास (१८८८)
- सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
- उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
- चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
- पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
- टीप : पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
- पंडित स्वामी श्रीमद्दयानंद सरस्वती (१८८३)
- पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
- धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
- खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
- गीतातत्त्व (१८७८)
- सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
- स्वाध्याय
- प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
- आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
- आगमप्रकाश (गुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
- निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
- राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
- लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
- हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
- स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
- ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
- स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
- समाजचिंतन : (एकूण ५ पुस्तके)
- जातिभेद (१८८७)
- भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
- प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
- कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
- निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
- विद्यालहरी (?)
- संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
- होळीविषयी उपदेश (१८४७)
- महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
- सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
- यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
- पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
- पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
- शब्दालंकार (१८५१)
- हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
- आत्मचरित्र
- एका दिवसात लिहिलेले पुस्तक
- विचारलहरी
- हिंदुस्थानातील बालविवाह
- लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
- लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
- लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
- निबंध : (एक)
- लोकहितवादींची शतपत्रे : (डाॅ. अ.का. प्रयोळकर यांनी ‘लोकहितवादीकृत निबंध संग्रह’ या नावाने ह्या शतपत्रांचे पुनःसंपादन करून ती प्रसिद्ध केली आहेत -ललित प्रकाशन
- लोकहितवादीचे साहित्य समाज, धर्म, अर्थ, इतिहास आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.
- ग्रंथ : ग्रामरचना, लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्तानचा इतिहास, गुजरात लंका, राजस्थान, पानिपत, पृथ्वीराज चौहाणचा इतिहास.
- इ. स. १८४८ ते ९२ या काळा
- त लोकहितवादीनी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले.
- लक्ष्मीज्ञान – १८४९
- भारतखंड पूर्व – १८५१
- हिदुस्थानचा इतिहास, पूर्वाध, The History of British Empire in India (ग्लीनच्या ग्रंथाचा अनुवाद) ठाणे – १८७८
- पनिपतची लढाई (काशीराज पंडित यांच्या फारशी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचा मराठी अनुवाद) १८७७
- ऐतिहासिक गोष्ट – भाग १, २ व ३ (१८७७, ७८, ७९)
- हिंदूस्थानात दरिद्रयता येण्याची कारणे व त्यांचा परिवार आणि व्यापारविषयी विचार (१८७६)
- अश्रलायन गृहासुत्र (अनुवाद) मुंबई – १८८०
- स्थानिक स्वराज्य व्यवस्था, पुणे (१८८२-८३)
- ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्ली स्थिती, पुणे. (१८८३)
- गुजरात देशाचा इतिहास, पुणे – १८८५
- लंकेचा इतिहास, पुणे – १८८८
- सौराष्ट्र देशाचा इतिहास, पुणे – १८९१
- उदयपूरचा इतिहास कर्नल रॉकच्या Analist anti auities of Rajasthan या ग्रंथाचे भाषांतर
- पृथ्वीराज चौहानचा इतिहास
- स्वाध्याय (स्वातंत्र्य) प्राचीन आर्थविधांचा क्रम, विचार व परिक्षण
- आगमप्रकाश (मुळ ग्रंथ गुजराती)
- होळीविषयी उपदेश
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents