गोपाळ गणेश आगरकर 1856 – 1895 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८५६ - मृत्यू : १८९५)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.
जन्म : १४ जुलै १८५६ (टेंभू जि. सातारा) –
वडिल : गणेश आगरकर
गोपाळ गणेश आगरकर : कऱ्हाड (मामाकडे)
मॅट्रिक पर्यंत शिक्षण – अकोला
- वऱ्हाड समाचार लेख
- पुण्यात १८८१ इतिहास व तत्वज्ञान विषय घेऊन एम. ए. केले. १८८० न्यु इंग्लिश स्कूल, स्थापनेत पुढाकार घेतला. (आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूनकर, टिळक)
शैक्षणिक :
- २४ ऑक्टोबर १८८४ आगरकर आणि टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- १८८५ फर्ग्युसन कॉलेज स्थापना.
- आगरकर १८९२-९५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक. १८८५ न्यु इंग्लिश स्कूलचे सुप्रीटेडंट म्हणून नियुक्ती
- १८९० फर्ग्युसन कॉलेज व डेक्कन एज्यु. सोसायटी सदस्यांचा राजीनामा.
- प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे.
जे पालक मुलामूलींना प्राथमिक शिक्षण देणार नाही त्यांना दंड.
- मुलामूलींना बरोबरीने शिक्षण देण्याची भूमिका.
- विद्यापीठ शिक्षणाचे माध्यम देशी असावे असे त्यांना वाटत होते.
- प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी.
वाङमयीन कार्य :
- लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या केसरी व मराठा यापैकी केसरीचे संपादक आगरकर.
- इष्ट असेल तर बोलणार व साध्य असेल तेच करणार हे केसरीचे ब्रिद वाक्य.
- मतभेदामुळे २५ ऑक्टोबर १८८७ ला केसरीचे संपादकत्व सोडले.
- १५ ऑक्टोबर १८८८ सुधारक हे साप्ताहिक काढले. (मराठी लेखन)
- आगरकरांच्या मृत्यूनंतर १९१४ पर्यंत देवधर व पटवर्धन यांनी वृत्तपत्र चालवली. तर १९१४-१६ पर्यंत रामचंद्र विष्णु करनडे यांनी सुधारक चालविली.
- स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे असा लेख लिहीला.
- हिंदूस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात त्यांनी सरकारचा स्वार्थीपणा अधोरेखित केला.
- गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात त्यांनी भारतीयाकडे धैर्य, ज्ञान, उत्साह यांची उणीव आहे, ते कष्टाळू नाहीत आणि त्यांच्याकडे सत्य सांगण्याची हिम्मत नाही असे लिहिले.
सामाजिक कार्य :
– बुद्धीवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.
– व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला.
– आगरकरांनी सुधारक वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात हिंदू सामाजाच्या दुरावस्थेची कारणे –
१) लोकांची भूगोल व इतिहासाविषयीचे अज्ञान २) समाजातील तर्कहीन आकार – विचार
३) समाजातील जातीभेद अस्पृश्यता ४) समाजातील स्त्रीयांची हलाखीची परिस्थिती
५) देशातील परंपरागत राजेशाही ६) लोकांतील देशाभिमानाचा अभाव
– पुणे पालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या हौदावर ‘ब्राह्मणासाठी’ व ‘क्षुद्रांसाठी’ असे फलक होते. त्यावर ३० जानेवारी १८९३ ला आगरकरांनी मुन्सिपल हौद व ‘ब्राह्मन्यांवर गदा’ हा लेख लिहून अस्पृश्यतेवर टिका केली.
स्त्री सुधारणा :
- त्यांच्या मते स्त्रियांच्या दुःस्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बालविवाह.
- विद्यार्थी व सुशिक्षीत तरुणांना बालविवाह विरोध पुढाकार घ्यायला सांगितले, त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बालविवाह निर्बंधक मंडळी स्थापावी व त्याची संख्या २००० असावी व निधि उभारावा म्हणजे बालविवाह विरोधात यशस्वी कार्य करता येईल असे सांगितले.
- स्त्रीयांच्या स्वयंवर विवाह पद्धतीस विरोध
- ५०/६० वर्षाचा पुरुष व ११/१२ वर्षांची मुलगी यांचा विवाहाला जरठ विवाह म्हणतात. त्यांनी जरठविवाहास विरोध केला.
स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार :
- सुधारकमध्ये मराठमोळा व मराठमोळ्याची पूरवणी हे लेख लिहीले.
- स्त्री पुरुषात समानता.
- संतती नियमाला पाठींबा दिला.
धार्मिक विचार: मूर्तीपुजा मान्य नव्हती.
- मुर्तीपूजेचा उद्रेक व मुर्तीपूजेचे प्रकार हा लेख लिहिला.
- ईश्वराचे अस्तित्व नाकारले.
- पशुहत्येवर टीका केली.
- आगरकरांनी १९ व २६ डिसेंबर १८१२ रोजी सुधारकमध्ये प्रेनक्रिया व प्रेतसंस्कार शिर्षकाचे २ लेख लिहिले.
- सोवळ्यांची मिमांसा व सोवळ्या ओवळ्यांची पूरवणी हे दोन लेख लेहून सोवळ्या ओवळ्यांची कल्पना मांडली.
- आगरकरांना बद्धीवादाचे जनक म्हटले जाते.
इतर :
- अकोल्यातील शिक्षण ‘व्ही. एम. महाजनी’ या शिक्षकाच्या मदतीने विधवा विवाहाचा पुरस्कार केला व केशव कर्वे आणि गोंदूताईचा विवाह घडविला.
- पुण्यातील सनातनी मंडळींनी आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेत यात्रा काढली.
- वाक्य मिमांसा व वाक्याचे पृथ्यकरण (१८८८), केसरीतील निवडक निबंध भाग – १ व २ (१८८७) जात्युच्छोक निबंध शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पूनर्विवाह चरित्र लिहीले.
- शब्दापेक्षा ज्ञान व ज्ञानपेक्षा विज्ञान शेष्ठ अशी भावना.
भाष्यकार:
- गो. कृ. गोखले विद्वान पंडित, देशभक्त, निर्भय शक्तीवान पुरुष म्हणजे आगरकर यांच्यासारखी माणसे कित्येक – वर्षात एखाद्या वेळीच जन्माला येतात म्हणून त्यांचा मृत्यू राष्ट्रीय आपत्ती ठरतो.
- मे. पु. गे – ‘आगरकर हे विवकवादाचा संत होते.
- गोपाळ गणेश आगरकर याच्या स्मृतीप्रित्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ. स. १९३४ साली ‘आगरकर हायस्कूल’ ही मूलींची शाळा स्थापन केली.
- मृत्यू – १८९५
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents