गतीविषयक नियम :
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गतीविषयक नियम :
गती :
-
जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
-
आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
-
गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
बल :
-
स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
-
वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
-
बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
-
बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
-
बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
-
वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
संतुलित बल :
-
जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
-
दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
-
संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
असंतुलित बल :
-
असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
-
वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
-
जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
जडत्व :
-
वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.
-
जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.
जडत्वाचे प्रकार :
1. विराम अवस्थेतील जडत्व :
-
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.
-
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
2. गतीचे जडत्व :
-
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.
-
उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.
3. दिशेचे जडत्व :
-
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
-
उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.
न्यूटनचे गतीविषयक नियम :
पहिला नियम :
‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
दूसरा नियम :
‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
संवेग –
वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
mv-mu/t
m(v-u)/t
तिसरा नियम :
‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents