गणेश वासुदेव जोशी (ग. वा. जोशी)1828 – 1888 यांच्या बद्दल संपूर्ण महिती

(जन्म : १८२८ - मृत्यू : १८८८)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
548

गणेश वासुदेव जोशी (ग. वा. जोशी) यांच्या बद्दल संपूर्ण महिती

 

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका (९ एप्रिल, इ.स. १८२८ – २५ जुलै,इ.स. १८८०) हे मराठी समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.

सार्वजनिक काका

जन्म: ९ एप्रिल १८२८ सातारा

सार्वजनिक संस्थेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणुन सार्वजनिक काकांची ओळख.

शिक्षण – पुणे

  • १८५२ सर्वप्रथम स्वदेशीचा पुरस्कार, खादीचा प्रचार
  • स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळे स्थापन.
  • १८७० एल. एल. बी. (कायद्याची पदवी) – पुणे
  • १८७० भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा औधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. यात मुख्य सहभाग काकांचाच होता.
  • १८७० सार्वजनिक सभेचे पहिले सरचिटणीस.
  • १८७१ काकांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी स्त्री विचारवती संस्था स्थापन केली.
  • १८७३ ब्रिटीश सरकारला दुष्काळाचा अहवाल पाठवला.
  • १८७६ काकांनी सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून दिली.
  • १८७७ लॉर्ड लिटन यांनी भरवलेल्या दिल्ली दरबार रत्न ग. वा. जोशी यांनी मान पत्राचे वाचन केले.
  • १८७८ मुद्रण स्वातंत्र्यावरील (प्रेस) निर्बंध कायद्याचा सार्वजनिक सभेच्या वतीने विरोध केला.
  • सार्वजनिक क्षेत्रात सेवा म्हणून लोकांनी त्यांचे नाव सार्वजनिक काका असे ठेवले.
  • १८७९ कुणालाही न डगमगता वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले.
  • सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप देण्याचे काम न्यायमुर्ती रानडे व सार्वजनिक काका (ग. वा. जोशी) यांनी केले.

जीवन

गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात ९ एप्रिल इ.स. १८२८ रोजी झाला. सर्व भावंडात ते धाकटे होते. त्यांचे बालपण सातारा या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न हेही सातारी येथेच झाले. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते सातारा येथे होते. इ.स. १८४८ साली ते पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर पुणे हेच त्यांच्या वास्तव्याचे क्षेत्र होते.

त्यांना एकूण ५२ वर्षांचे आयुष्य लाभले. इ.स. १८४८ ते इ.स. १८६९ ह्या सुमारे बावीस वर्षांच्या काळात त्यांनी नोकरी केली. ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी केली. यानंतरची १० वर्षं त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली.

शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे.

गणेश वासुदेव जोशी
गणेश वासुदेव जोशी

पुणे सार्वजनिक सभा

गणपतरावांनी २ एप्रिल १८७० रोजी ‘पुणे सार्वजनिक सभे’ची स्थापना केली.या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना ‘सार्वजनिक काका’ हे टोपणनाव मिळाले. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी ‘सार्वजनिक सभा’ ही जनतेची गार्‍हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती.

इ.स. १८७० ते इ.स. १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः इ.स. १८९६-९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकीय क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा वर्ष मुख्यतः सार्वजनिक काकांनी केले. तिच्मार्फत विविध उपक्रम करून त्यांनी लोकजागृती केली. सभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती.

वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिक काका जोशी हे न्या.रानडे यांचे चांगले स्नेही होते.

नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले (१८४८) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला (१८५६). नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (१८६५) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला.

क्रांतिवीर  वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले. ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्‌गार त्यांनी यावेळी काढले होते.

  • मृत्यू  – २५ जुलै १८८८

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम