गणेश दामोदर सावरकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८७९ - मृत्यू : १९४५)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
गणेश दामोदर सावरकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
जन्म : १३ जून १८७९, भगूर – नाशिक
मृत्यू: १६ मार्च १९४५
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
संघटना : अभिनव भारत, मित्रमेळा
प्रभाव : शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक
वडील : दामोदर सावरकर
आई : राधाबाई सावरकर
पत्नी : यशोदा उर्फ येसूताई
-
लेखन :
राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनम या टोपण नावाने काशी येथे लिहीले. १९३४ साली प्रकाशन
- हिंदुराष्ट्र – पुर्वी – आता – पुढे – शिवरायांची आमावरील गरुडझेप
- वीरा – रत्ना – मंजुषा – ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
- धर्म कशाला हवा ? – मोपल्यांचे बंड
- वीर बैरागी, मुळ हिंदी भाषेतील पुस्तकावरुन भाषांतरीत केलेले पुस्तक.
-
कार्य :
-१९०० मित्रमेळा संस्था उघडपणे सुरु, बाबाराव या संस्थेचे कार्यवाहक होते.
– १९०४ मित्रमेयची संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन.
अभिनव भारत जहालवाद्यांची संस्था होती.
– १९०३ मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था स्थापन
-१९०५ आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली.
-२६ फेब्रुवारी १९०९ बाबारावांना मुंबई येथे अटक व देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.
–८ जून १९०९ जन्मठेपेची शिक्षा.
-इ. स. १९११ अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठविण्यात आले.
-इ. स. १९२१ अंदमान मधून सुटका.
-इ. स. १९२२ शिक्षा संपल्याचे कळवून सुटका.
क्रांतिकार्य
तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते.मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले.
बाबांच्या प्रयत्नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.
-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार – होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.
बाबाराव सावरकरांसंबंधी पुस्तके
- क्रांतिकारक बाबाराव सावरकर (लेखक दुर्गेश परुळकर)
- क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक द. न. गोखले
- त्या तिघी (सावरकर बंधूंच्या पत्नी येसूवहिनी (बाई), यमुना(माई) आणि शांता(ताई) यांच्यावरील कादंबरी (लेखिका डॉ. शुभा साठे)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents