ग. दी. मांडगूळकर (1919-1977) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १९१९ - मृत्यू : १९७७)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले.
ग. दी. मांडगूळकर यांच्या (1919-1977) बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : २ ऑक्टोबर १९१९ (शेटफळे – सांगली)
मृत्यू: १४ डिसेंबर १९७७ (पुणे)
नाव: गजानन दिगंबर मांडगूळकर
टोपन नाव: गदिमा
वडीलांचे नाव : दिगंबर बळवंत मांडगूळकर (औंध संस्थान कारकून)
आईचे नाव : बनुताई दिगंबर मांडगूळकर
अपत्ये : आनंद व श्रीधर
कार्यक्षेत्र : साहित्य व चित्रपट
साहित्य प्रकार : गीतरचना कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती : गीतरामायण
शिक्षण : नॉन मॅट्रिक
- १९३५ मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश (ब्रह्मचारी)
- १९४२ प्रथम गीतलेखन (भक्त दामाची व पहिला पाळणा)
- १९४२ सातारा, सांगली येथे प्रतिसरकारचा प्रसार अप्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात सहभाग,
अध्यक्ष / सदस्य :
- १९६१ महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद अध्यक्ष
- १९६१ महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड सदस्य.
- १९६१ फिल्म अॅडव्हायसरी बोर्ड सदस्य.
- १९६२-७४ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (आमदार)
- १९६४ नाट्य परीक्षण मंडळ सदस्य.
- १९६७ तुरुंग आणि कारावास सल्लागार समिती सदस्य.
- १९६४-६९ पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य
- मराठी चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष
- १९६९ मराठी नाट्य परिषद सदस्य
- १९७६ महाराष्ट्र राज्य कुटूंब नियोजन सल्लागार समिती सदस्य.
- १९७६ मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पुणे.
- १९७३ मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष, यवतमाळ
- १९७६ मराठी साहित्य संमेलन (विभागीय अध्यक्ष), इंदौर, बडोदरा, म्हापसा, ग्वाल्हेर
पुरस्कार :
१९६९ पद्मश्री
१९६९ : संगीत नाटक अकादमी व विष्णूदास भावे सुवर्णपदक
- महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
- शाहीर परशुराम पुरस्कार
- फाळके गौरव चिन्ह. सुरसिंगार
- अकादमी सन्मान.
- रेडिओ मिरची म्युझिक सन्मान.
- सर्वोत्कृष्ट अल्बम – लाखाचे गोष्ट
पुस्तके
ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-
- कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)
- गीतयात्री गदिमा : लेखक – मधू पोतदार
- ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन (श्रीपाद जोशी)
- गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
ग दि माडगूळकर यांनी ‘भूमिकन्या सीता’या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी’, ‘मानसी राजहंस पोहतो’,’सुखद या सौख्याहुनी वनवास’ ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.
त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).
तूफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूॅंज उठी शहनाई (१९५९) हे त्यांची पटकथा असलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत.
त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांच्या नावाचे ‘गदिमा प्रतिष्ठान’ काढण्यात आले आहे. माडगूळकर यांचे पुणे येथे निधन झाले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents