एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
225

 एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

राज्य शासनकडून ऑफलाईन पध्दतीने सन 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे, सर्व प्रवर्गासाठी होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.

 योजनेच्या प्रमुख अटी :

1) विधी, वाणिज्य व कला शाखेमध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेकरिता किमान 70 टक्के पदवी अभ्यासक्रमामध्ये गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
2) लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 75 हजार रुपये पेक्षा कमी असावे.
3) सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
4)संबंधित लाभार्थी कुठेही पूर्ण किंवा अर्धवेळ नोकरी करणारा नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

1. पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
2. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
3. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.

लाभाचे स्वरूप असे :

पदव्युत्तरस्तर (2 वर्ष) साठी – दरवर्षी 5 हजार रुपये रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा केली जाते.

संपर्क साधावा :

उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.

 एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम