आठवी पंचवार्षिक योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
155

आठवी पंचवार्षिक योजना

 

कालावधी : 1 एप्रिल,1992 ते 31 मार्च, 1997
मुख्यभर : मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास
प्रतिमान : पी.व्ही. राव व मनमोहन सिंग
मुख्यभर : मानवी विकास

 

योजना खर्च :

प्रास्तावित खर्च : 4,34,120 कोटी रु.
वास्तविक खर्च : 4,74,121 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर – 5.6%
प्रत्यक्ष वृद्धी दर – 6.8%

 

विभागवार आर्थिक वाटप :

1. ऊर्जा (26%)
2. वाहतूक व दळणवळण (18%)
3. शेती व इतर (12%)

 

उद्दिष्ट्ये :

1. शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पुरेशा रोजगाराच्या संधि निर्माण करणे.
2. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे.
3. 15 ते 35 वर्ष वायोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे.
4. सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,प्राथमिक आरोग्य सोयी-सुविधा पुरवणे, त्यांना रोगराईपासुन मुक्त करणे इ.
5. कृषि क्षेत्राचा विकास व विविधिकरण करून अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे व निर्मितीसाठी योग्य असा शेतमालाचा आढावा निर्माण करणे.
6. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचनसोई इ सोई-सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देवून भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणे.

 

विशेष घटनाक्रम :

1. 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
2. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय, 1993-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय,    तर       1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला.
3. 1992 मध्ये (SEBI) ला संवैधानिक दर्जा देण्यात आला.
4. 1992 मध्ये 73 व 74 व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला.
5. 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली.
6. 1996 मध्ये भारतात पहिल्यांदा डीपॉझिटची प्रणालीची सुरवात करण्यात आली.

 

सुरू करण्यात आलेल्या योजना :

1. राष्ट्रीय महिला कोष – 1992-93 मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला.
2. 2 ऑक्टोंबर 1993 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या
अ. आश्वासीत रोजगार योजना
ब. पंतप्रधान रोजगार योजना
क. महिला समृद्धि योजना – ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृती वाढीस लागणे हे तिचे उद्दीष्ट आहे.
3. 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली.
4. 15 ऑगस्ट 1995 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या

अ. मध्यान्न आहार योजना

ब. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना

क. इंदिरा महिला योजना

 

आठवी पंचवार्षिक योजना

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम